मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: केन विल्यमसन मुंबई टेस्टमधून Out, 'या' खेळाडूकडं न्यूझीलंडचं नेतृत्त्व

IND vs NZ: केन विल्यमसन मुंबई टेस्टमधून Out, 'या' खेळाडूकडं न्यूझीलंडचं नेतृत्त्व

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्ट सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कॅप्टन केन विल्यमसन ही टेस्ट खेळणार नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 डिसेंबर :  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्ट सुरू होण्यापूर्वीच दोन्ही टीमला मोठे धक्के बसले आहेत. टीम इंडियाचे  इशांत शर्मा (Ishant Sharma),  रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अजिंक्य रहाणे (Ainkya Rahane) हे तीन खेळाडू दुखापतीमुळे मुंबई टेस्टमधून आऊट झाले आहेत.  भारतीय टीमला मिळालेले हे धक्के ताजे असतानाच न्यूझीलंडलाही मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) मुंबई टेस्ट खेळणार नाही. विल्यमसनचा कोपर दुखावला असून तो ही टेस्ट खेळणार नसल्याचं न्यूझीलंडच्या मॅनेजमेंटनं स्पष्ट केलं आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीमध्ये टॉम लॅथम (Tom Latham) या टेस्टमध्ये न्यूझीलंडची कॅप्टनसी करणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कानपूर टेस्ट ड्रॉ झाली होती. त्यामुळे मुंबई होणारी दुसरी आणि शेवटची टेस्ट जिंकणे दोन्ही टीमला आवश्यक आहे. न्यूझीलंडनं कानपूरमध्ये सरस खेळ करत टेस्ट मॅच ड्रॉ करण्याचा पराक्रमक केला होता. आता मुंबई टेस्ट जिंकून सीरिज जिंकण्याची न्यूझीलंडला संधी आहे, पण त्यापूर्वी विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्यानं त्यांना मोठा धक्का बसला आहे.

IND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियाला 3 मोठे धक्के, दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

न्यूझीलंडच्या टीमला आजवर भारतात कधीही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. 1988 साली त्यांनी भारतामध्ये अखेरची टेस्ट मॅच जिंकली होती. त्यानंतर दोन्ही टीमनी 18 टेस्ट खेळल्या, ज्यातल्या 9 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 9 मॅच ड्रॉ झाल्या. न्यूझीलंडला  भारतात 34 पैकी फक्त 2 टेस्ट जिंकता आल्या आहेत. न्यूझीलंडने भारतात पहिली टेस्ट 1955 साली खेळली होती, म्हणजेच 66 वर्षांमध्ये त्यांना भारतात एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही

First published:

Tags: Cricket, New zealand