मुंबई, 3 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी आणि निर्णायक टेस्ट मुंबईत होत आहे. ही टेस्ट सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला 3 मोठे धक्के बसले आहेत. इशांत शर्मा (Ishant Sharma), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अजिंक्य रहाणे (Ainkya Rahane) हे तीन खेळाडू दुखापतीमुळे मुंबई टेस्टमधून आऊट झाले आहेत. बीसीसीआयनं ट्विट करत ही माहिती दिली आहे.
NEWS - Injury updates – New Zealand’s Tour of India
Ishant Sharma, Ajinkya Rahane and Ravindra Jadeja ruled out of the 2nd Test. More details here - https://t.co/ui9RXK1Vux #INDvNZ pic.twitter.com/qdWDPp0MIz — BCCI (@BCCI) December 3, 2021
कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानं टीम इंडियाला ही सीरिज जिंकणे आवश्यक आहे. या निर्णयाक टेस्टमध्ये टीम इंडियातील 3 प्रमुख खेळाडू आऊट झाल्यानं भारतीय टीमला मोठा धक्का बसला आहे. मुंबई टेस्टमध्ये विराट कोहली (Virat Kohli) पुनरागमन करत असून तो अजिंक्य रहाणेच्या जागी खेळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Team india