मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: टीम इंडियातील 'या' खेळाडूला आहेत 2 आई, विराटनं दिली 57 महिन्यानंतर संधी

IND vs NZ: टीम इंडियातील 'या' खेळाडूला आहेत 2 आई, विराटनं दिली 57 महिन्यानंतर संधी

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टला आता सुरूवात झाली आहे. या टेस्टमध्ये 2 आई असलेल्या खेळाडूला विराटनं संधी दिली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टला आता सुरूवात झाली आहे. या टेस्टमध्ये 2 आई असलेल्या खेळाडूला विराटनं संधी दिली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टला आता सुरूवात झाली आहे. या टेस्टमध्ये 2 आई असलेल्या खेळाडूला विराटनं संधी दिली आहे.

मुंबई, 3 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टला आता सुरूवात झाली आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय टीमला या टेस्टमध्ये दुखापतींचा फटका बसला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane),  रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) हे तीन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे आऊट झाले. त्यांच्या जागी विराट कोहली (Virat Kohli), जयंत यादव (Jatant Yadav) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या जयंत यादवचं तब्बल 57 महिन्यानंतर टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तो यापूर्वी फेब्रुवारी 2017 साली शेवटची टेस्ट मॅच खेळला होता. 31 वर्षांचा जयंत ऑफ स्पिनर असून हरयाणाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये एका शतकाची नोंद आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरच  त्यानं हे शतक झळकावलं आहे.

आईशी खास कनेक्शन

जयंतचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास साधा झालेला नाही. तो अगदी लहान असताना त्याच्या आईचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर सावत्र आईनं त्याचा सांभाळ केला. तसंच क्रिकेटपटू होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण केलं. 2016 साली त्यानं वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी जर्सीवर दोन्ही आईंची नावं लिहण्याची त्याची इच्छा होती. पण जर्सीवर त्याला जन्म देणाऱ्या लक्ष्मी या आईचं नाव होतं. या मॅचनंतर बोलताना जयंतनं आपल्याला दोन्ही आईंचं नाव लिहण्याची इच्छा होती, अशी भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर सावत्र आई ज्योती यांची माफी देखील मागितली.

जयंत यादवनं आजवर 4 टेस्ट खेळल्या असून 11 विकेट्स घेतल्या आहेत. तर 1 सेंच्युरी आणि 1 हाफ सेंच्युरीसह 228 रन केले आहेत. त्याचे बॅटींमधील कौशल्य पाहूनच ऑल राऊंडर रविंद्र जडेजा जखमी झाल्यानंतर त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.

IND vs NZ: केन विल्यमसन मुंबई टेस्टमधून Out, 'या' खेळाडूकडं न्यूझीलंडचं नेतृत्त्व

First published:

Tags: Cricket, Team india