जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: पदार्पणापूर्वीच भरतची कमाल, पण त्याच्या नावावर होणार का रेकॉर्डची नोंद? वाचा सविस्तर

IND vs NZ: पदार्पणापूर्वीच भरतची कमाल, पण त्याच्या नावावर होणार का रेकॉर्डची नोंद? वाचा सविस्तर

IND vs NZ: पदार्पणापूर्वीच भरतची कमाल, पण त्याच्या नावावर होणार का रेकॉर्डची नोंद? वाचा सविस्तर

कानपूर टेस्टमधील तिसऱ्या दिवशी केएस भरत (KS Bharat) विकेटकिपिंग करत आहे. भरतनं अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्यामुळे पदार्पणापूर्वीच त्याने केलेल्या कामगिरीची नोंद त्याच्या नावावर होणार का? असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडनं सुरुवात दमदार केली होती. टॉम लॅथम (Tom Latham) आणि विल यंग (Will Yong) या ओपनिंग जोडीनं 151 रनची पार्टनरशिप करत भारतीय बॉलर्सना त्रस्त केले होते. कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाच्या 11 खेळाडूंना जे जमत नव्हते. ते काम 12 व्या खेळाडूनं केले. टीम इंडियाचा नियमित विकेट किपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) विकेट किपिंगसाठी मैदानात उतरला नाही. साहाची मान दुखावली असून त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. साहाच्या अनुपस्थितीमध्ये केएस भरत (KS Bharat) विकेट किपिंग करण्यासाठी मैदानात उतरला. अश्विनच्या बॉलिंगवर भरतनं विल यंगचा कॅच घेतला. यावेळी सुरुवातीला अंपायरनं यंग नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला होता. पण, भरतला तो आऊट असल्याची खात्री होती. कॅप्टन अजिंक्य रहाणेनं त्याचा सल्ला मानला आणि टीम इंडियाला पहिली विकेट मिळली.

जाहिरात

भरत फक्त यंगची कॅच घेऊन थांबला नाही. त्यानं सुरुवातीला अनुभवी रॉस टेलरचा कॅच पकडला. त्यानंतर शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या टॉम लॅथमचं स्टंपिंग केले. भरतनं अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्यामुळे पदार्पणापूर्वीच त्याने केलेल्या कामगिरीची नोंद त्याच्या नावावर होणार का? असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडला आहे. कुणाच्या नावर होणार नोंद? आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या क्रिकेटपटूने पदार्पण करण्यापूर्वी  बदली खेळाडू म्हणून फिल्डिंगमध्ये काही कामगिरी केली असेल तर त्याची नोंद ही त्या खेळाडूच्या नावावर होत नाही. ही नोंद त्या खेळाडूच्या नावावर न होता बदली खेळाडूच्या नावावर होते. महावीर आर्य या क्रिकेट सांख्यिकीतज्ज्ञांनी (cricket statistician) ‘न्यूज18 लोकमत डॉट कॉम’बरोबर बोलताना ही माहिती दिली आहे. IND vs NZ: कानपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीच्या खास व्यक्तीची मैदानात एन्ट्री त्यामुळे केएस भरतनं कानपूर टेस्टमध्ये बदली खेळाडू म्हणून टीम इंडियासाठी केलेल्या कोणत्याही कामगिरीची नोंद त्याच्या नावावर होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात