मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: 89 वर्षांत कुणालाही जमलं नाही ते श्रेयसनं केलं, 'हा' रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

IND vs NZ: 89 वर्षांत कुणालाही जमलं नाही ते श्रेयसनं केलं, 'हा' रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमध्येच पदार्पण केले आहे. या टेस्टमध्ये त्यानं टीम इंडियाच्या 89 वर्षांच्या इतिहासात कुणालाही न जमलेला रेकॉर्ड केला आहे.

श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमध्येच पदार्पण केले आहे. या टेस्टमध्ये त्यानं टीम इंडियाच्या 89 वर्षांच्या इतिहासात कुणालाही न जमलेला रेकॉर्ड केला आहे.

श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) कानपूर टेस्टमध्येच पदार्पण केले आहे. या टेस्टमध्ये त्यानं टीम इंडियाच्या 89 वर्षांच्या इतिहासात कुणालाही न जमलेला रेकॉर्ड केला आहे.

कानपूर, 28 नोव्हेंबर: कानपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाची श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) सुटका केली आहे. रविवारी सकाळी टीम इंडियाची अवस्था 5 आऊट 51 अशी झाली होती. त्यावेळी श्रेयसनं आधी आर. अश्विन (R. Ashwin) आणि नंतर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांच्या मदतीनं टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. श्रेयसनं 94 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीनं अर्धशतक झळकावले.

श्रेयसनं कानपूर टेस्टमध्येच पदार्पण केले आहे. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावत 105 रन काढले होते. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस हा 16 वा भारतीय आहे. त्यापाठोपाठ श्रेयसनं आणखी एक रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड भारतीय क्रिकेटच्या 89 वर्षांच्या इतिहासात आजववर कुणालाही जमलेला नाही. त्यानं पदार्पणातील टेस्टच्या एका इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड केला आहे.

साऊदीनं घेतली विकेट

श्रेयस अय्यर अर्धशतकानंतरही आत्मविश्वासानं खेळत होता. त्याची या टेस्टमधील आणखी एक चांगली इनिंग टीम साऊदीनं (Tim Southee) संपुष्टात आणली. श्रेयसनं 65 रन काढले. या खेळीच्या दरम्यान त्यानं 125 बॉलचा सामना करत 8 फोर आणि 1 सिक्स लगावला. श्रेयसनं या टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये टीम इंडिया अडचणीत असताना चांगली खेळी करत टीमला सावरले आहे. पहिल्या इनिंगमध्ये 3 आऊट 106 असा स्कोअर असताना श्रेयस बॅटींगला आला होता. त्यावेळी त्यानं शतक झळकावल्यानं टीम इंडियाला 345 पर्यंत मजल मारता आली.

IPL 2022: धोनीच्या सहकाऱ्यानं 9 सिक्स लगावत केली बॉलरची थट्टा, CSK लवकरच देणार बक्षीस

दुसऱ्या इनिंगमध्ये 3 आऊट 41 अशी आणखी नाजूक परिस्थिती होती तेव्हा श्रेयसनं मैदानात पाऊल ठेवले. त्यानं सुरूवातीला अश्विनसोबत 52 रनची आणि नंतर साहासोबत 66 रनची भागिदारी करत टीम इंडियाची आघाडी 200 च्या पुढे नेली आहे. या दोन्ही इनिंगमध्ये नाजूक क्षणी झुंजार खेळ करत श्रेयसनं आपण 'लंबी रेस का घोडा' असल्याचं दाखवून दिलं आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Shreyas iyer, Team india