कानपूर, 28 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कानपूरमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची सुरूवात धक्कादायक झाली. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे टीम इंडियाचे दिग्गज पुन्हा एकदा अपयशी ठरले. इंग्लंड दौऱ्यातही या दोघांनी रन काढण्यासाठी संघर्ष केला होता. कानपूर टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही त्यांना मोठा स्कोअर करण्यात अपयश आले होते. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही त्यांनी स्पशेल निराशा केली आहे. चौथ्या दिवशी सकाळी कायले जेमीसननं पुजाराला सर्वप्रथम आऊट केले. विकेट किपर ब्लंडेलनं पुजाराचा कॅच घेतला. मैदानातील अंपायरनं पुजाराला आऊट दिले नव्हते. या निर्णयाच्या विरोधात न्यूझीलंडलं DRS घेतले. त्यावेळी पुजारा आऊट असल्याचे स्पष्ट झाले.
An early wicket for New Zealand 💥
— ICC (@ICC) November 28, 2021
Cheteshwar Pujara is caught behind by Tom Blundell for 22 off Kyle Jamieson.#WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/299QqB1NKs
चेतेश्वर पुजारा आऊट झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला. कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) तर फक्त 4 रन काढून आऊट झाला. एजाज पटेललं त्याला आऊट केले.
Ajaz Patel gets the wicket of India captain Ajinkya Rahane ☝️
— ICC (@ICC) November 28, 2021
The spinner dismisses him LBW for 4. #WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/AyWkMiF65N
चेतेश्वर पुजारा नंबर 3, विराट कोहली नंबर 4 आणि अजिंक्य रहाणे नंबर 5 अशी टीम इंडियाची टेस्टमधील बॅटींग ऑर्डर बऱ्याच वर्षांपासून आहे. कानपूर टेस्टमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीमध्ये श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळाली. श्रेयसनं पहिल्या इनिंगमध्ये 105 रनची खेळी करत ही निवड सार्थ ठरवली. आता मुंबई टेस्टमध्ये विराट टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे विराटसाठी अजिंक्य रहाणे किंवा चेतेश्वर पुजारा या दोन दिग्गजांपैकी एकाला टीम मॅनेजमेंटला वगळावे लागेल. या दोघांच्या खराब फॉर्ममुळे त्यांना आणखी वाचवणे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही जड जाणार आहे. दिल्लीच्या टीमला चिअर करण्यासाठी पोहचली Sunny leone, पाहा VIDEO