Home /News /video /

दिल्लीच्या टीमला चिअर करण्यासाठी पोहचली Sunny leone, पाहा VIDEO

दिल्लीच्या टीमला चिअर करण्यासाठी पोहचली Sunny leone, पाहा VIDEO

यूएईमध्ये सध्या टी10 लाीग सुरु आहे. शनिवारी या स्पर्धेतील 21 वी मॅच दिल्ली बुल्स आणि डेक्कन ग्लॅडिएटर्स (Delhi Bulls vs Deccan Gladiators) यांच्यामध्ये झाली. या मॅच दरम्यान अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) दिल्लीच्या टीमला चिअर करताना दिसली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 नोव्हेंबर: यूएईमध्ये सध्या टी10 लाीग सुरु आहे. शनिवारी या स्पर्धेतील 21 वी मॅच दिल्ली बुल्स आणि डेक्कन ग्लॅडिएटर्स (Delhi Bulls vs Deccan Gladiators) यांच्यामध्ये झाली. या मॅच दरम्यान अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) दिल्लीच्या टीमला चिअर करताना दिसली. आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) या टीमचा कॅप्टन आहे. तर सनी ही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. सनी तिच्या टीमला चिअर करण्यासाठी यूएईमध्ये गेली आहे. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये सनीच्या दिल्ली टीमचा पराभव झाला. दिल्लीनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 10 ओव्हर्समध्ये 6 आऊट 94 रन केलेय डेक्कननं 95 रनचं लक्ष्य 6.1 ओव्हरमध्येचे पूर्ण केले. सनीनं मात्र दिल्लीचा उत्साह वाढवण्याची एकही संधी सोडली नाही. सनीचा नवरा डेनिअल वेबर देखील यावेळी उपस्थित होता. सनी लिओनी यापूर्वी गुरुवारी देखील दिल्लीच्या मॅचमध्ये उपस्थित होती. त्यामध्ये दिल्लीनं 8 विकेट्सनं विजय मिळवला होता. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये डेक्कनकडून टॉम बेंटननं 18 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं नाबाद 46 रन काढले. तर नजीबुल्लाह जरदारननं 11 बॉलमध्ये चार सिक्स आणि 2 फोरच्या मदतीनं 35 रन काढले. यापूर्वी दिल्लीकडून रोमारिओ शेफर्डनं 10 बॉलमध्ये चार सिक्स आणि 1 फोरच्या मदतीनं नाबाद 26 रन काढले होते. कॅप्टन ड्वेन ब्राव्हो फक्त 6 रन काढून आऊट झाला. तयारीसाठी मिळाले फक्त 12 मिनिटे! टीम इंडियाच्या खेळाडूनं सांगितला 'तो'अनुभव VIDEO
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Sunny Leone

    पुढील बातम्या