कानपूर, 27 नोव्हेंबर: कानपूर टेस्टमध्ये भारती बॉलर्लनी खराब सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक केले आहे. न्यूझीलंडच्या टॉम लॅथम (Tom Latham) आणि विल यंग (Will Young) या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 151 रनची भागिदारी केली. या जोडीनं दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलर्सना यश मिळू दिलं नाही. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी देखील त्यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यावेळी न्यूझीलंड मोठी आघाडी घेणार असं चित्र होतं. भारतीय बॉलर्सनं त्याचवेळी कमबॅक केले. अनुभवी आर. अश्विननं (R. Ashwin) विल यंगला आऊट करत ओपनिंग जोडी फोडली. लंच होण्यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच उमेश यादवनं (Umesh Yadav) न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनला आऊट करत टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. लंचनंतर टीम इंडिया मैदानात परतली तेव्हा जेवून ताजा झालेल्या टीम इंडियचाच्या ‘बापू’ ने म्हणजेच अक्षर पटेलनं न्यूझीलंडच्या इनिंगला खिंडार पाडले. अक्षरनं सुरूवातीला अनुभवी रॉस टेलरचा अडथळा दूर केला. त्यापाठोपाठ हेन्री निकोल्सला मैदानात स्थिरावू दिलं नाही. तो फक्त 2 रन काढून आऊट झाला. या दोन विकेटनंतर अक्षरनं न्यूझीलंडला सर्वात मोठा धक्का दिला. एक बाजू लावून मैदानात तळ ठोकून बसलेल्या टॉम लॅथमला त्याने चकवलं. लॅथमचं शतक फक्त 5 रननं हुकलं. टी टाईमनंतरही बापूचा जलवा कायम आहे. त्याने टॉम ब्लंडेल आणि टीम साऊदी यांना आऊट करत या इनिंगमधील 5 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
Axar Patel is on 🔥
— ICC (@ICC) November 27, 2021
A fifth Test five-wicket haul for the spinner! #WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/5QagQh9xkm
अक्षर पटेलनं याचवर्षी इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमधील 3 टेस्टमध्ये 27 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला होता. त्या सीरिजनंतर अक्षर आठ महिन्यांनी टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी उतरला होता. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये परतताच कमाल करत इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. 4 टेस्टच्या छोट्या कारकिर्दीमध्ये अक्षरनं पाचव्यांदा एका इनिंगमध्ये 5 किंवा त्या पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर एका टेस्टमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरीही त्यानं एकदा केली आहे. IND vs NZ: पदार्पणापूर्वीच भरतची कमाल, पण त्याच्या नावावर होणार का रेकॉर्डची नोंद? वाचा सविस्तर