Home /News /sport /

IND vs ENG: पंत, साहा नाही तर पहिल्या मॅचमध्ये ‘हा’ असेल टीम इंडियाचा विकेट किपर

IND vs ENG: पंत, साहा नाही तर पहिल्या मॅचमध्ये ‘हा’ असेल टीम इंडियाचा विकेट किपर

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टपूर्वी (India vs England Test Series) टीम इंडियावर कोरोनाचा वार झाला आहे. विकेट किपर-बॅट्समन ऋषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाली आहे.

    लंडन, 16 जुलै : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टपूर्वी (India vs England Test Series) टीम इंडियावर कोरोनाचा वार झाला आहे. विकेट किपर-बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि थ्रो डाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी (Dayanand Garani) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतरही इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. या दौऱ्यातील पहिली प्रॅक्टीस मॅच 20 जुलैपासून डरहॅममध्ये सुरु होणार आहे. या मॅचमध्ये ऋषभ पंत खेळणार नाही. त्याच्या जागी केएल राहुल (KL Rahul) विकेट किपरची जबाबदारी सांभाळेल. टीम इंडियातील आणखी एक विकेट किपर ऋद्धीमान साहा देखील सध्या आयसोलेशनमध्ये आहे. दयानंद गरानी यांच्या संपर्कात आल्यानं त्याला टीमपासून वेगळं ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राहुलवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुलचा ओपनिंग बॅट्समन म्हणून विचार करत नसल्याचं टीम मॅनेजमेंटनं यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो प्रॅक्टीस मॅचमध्ये मिडल ऑर्डरमध्ये बॅटींगला उतरेल. प्रॅक्टीस मॅच दिसणार LIVE भारत विरुद्ध काऊंटी सिलेक्ट इलेवन यांच्यात होणाऱ्या मॅचचं लाइव प्रसारण होणार आहे. डरहॅम काऊंटी क्लबच्या यूट्यूब चॅनलवर ही मॅच पाहता येणार आहे. या सामन्यासाठी काऊंटी सिलेक्ट इलेवन टीमची घोषणा करण्यात आली आहे. विल रोड्स  टीमचा कॅप्टन आहे. या टीममध्ये रेहान अहमद, टॉम एस्पिनवेल आणि हसीब हमीद या खेळाडूंचा समावेश आहे. VIDEO: 4 महिन्यांनी परतला टीम इंडियाचा स्टार, T20 वर्ल्ड कपची तयारी सुरू दिग्गज खेळाडूंवर लक्ष 20 जुलै रोजी सुरू होणारी प्रॅक्टीस मॅच टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. कॅप्टन विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात नाही. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर चांगल्या कामगिरीचा दबाव वाढला आहे. त्यांना पहिल्या टेस्टपूर्वी सरावाची ही चांगली संधी आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनिशपच्या फायनलमध्ये (WTC Final) एकही विकेट न घेणाऱ्या जसप्रीत बुमराहसाठी देखील ही मॅच महत्त्वाची आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, India vs england, Kl rahul, Rishabh pant

    पुढील बातम्या