मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO: 4 महिन्यांनी परतला टीम इंडियाचा स्टार, T20 वर्ल्ड कपची तयारी सुरू

VIDEO: 4 महिन्यांनी परतला टीम इंडियाचा स्टार, T20 वर्ल्ड कपची तयारी सुरू

आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय क्रिकेट टीममधील मिडल ऑर्डरचा बॅट्समन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) सरावाला सुरुवात केली आहे.

आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय क्रिकेट टीममधील मिडल ऑर्डरचा बॅट्समन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) सरावाला सुरुवात केली आहे.

आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय क्रिकेट टीममधील मिडल ऑर्डरचा बॅट्समन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) सरावाला सुरुवात केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 जुलै: आगामी टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय क्रिकेट टीममधील मिडल ऑर्डरचा बॅट्समन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) सरावाला सुरुवात केली आहे. श्रेयसनं जवळपास चार महिन्यांच्या कालावधीनंतर नेट प्रॅक्टीस केली. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील वन-डे मालिकेच्या दरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर श्रेयस क्रिकेटपासून दूर आहे.

श्रेयस अय्यरच्या नेट प्रॅक्टीसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस बॅटींगची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. श्रेयसला दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. तसेच श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियामध्येही त्याचा समावेश होऊ शकला नाही.

श्रेयस आता फिट झाला असून सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळण्याचं त्याचं लक्ष्य आहे. त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) आगामी देशांतर्गत सिझनसाठी निवडलेल्या 45 जणांमध्ये श्रेयसचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन कोण?

श्रेयस अय्यरनं 'द ग्रेट क्रिकेटर्स' या युट्यूब चॅनलवर आपल्या फिटनेस विषयी माहिती दिली होती. 'माझ्या खांद्याच्या उपचारांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अंतिम टप्प्यात स्ट्रेन्थ आणि रेंज मिळवण्याचं काम सुरू आहे. यासाठी जवळपास एक महिन्यांचा वेळ लागेल. आयपीएलमध्ये मी खेळू शकेन, असं वाटत आहे,' असं अय्यर म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.

श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व देण्यात आलं होतं. दिल्लीने या मोसमात सुरुवातीच्या 8 मॅचपैकी 6 मॅच जिंकल्या, त्यामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. आता आयपीएलचा पुढचा राऊंड युएईमध्ये होणार आहे, तेव्हा दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? असा सवाल अय्यरला विचारण्यात आला, तेव्हा त्याने टीमचे मालक यावर निर्णय घेतील, असं उत्तर दिलं.

टीम इंडियाला कोरोनाचा धोका वाढला! ऋषभ पंतनंतर आणखी एक जण पॉझिटिव्ह

'टीम आधीपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. सध्या टीम टॉपवर आहे. आमचं लक्ष्य ट्रॉफी जिंकणं आहे, कारण अजूनपर्यंत आम्हाला ती कधीच मिळाली नाही,' अशी प्रतिक्रिया त्याने दिली. अय्यरच्या नेतृत्वात मागच्या मोसमात दिल्ली फायनलमध्ये पोहोचली होती, पण मुंबई इंडियन्सनं त्यांचा पराभव केला होता.

First published:

Tags: Cricket, Delhi capitals, India, Shreyas iyer, Sports, T20 world cup