मुंबई, 24 मे : भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात जुलै महिन्यात होणाऱ्या एकमेव टेस्टसाठी चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) टीममध्ये पुनरागमन झालं आहे. पुजारा बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये होता. त्यामुळे भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सीरिजमधून त्याला वळण्यात आले होते. आता परिस्थिती बदलली आहे. इंग्लिश कौंटी क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर पुजाराचा पुन्हा एकदा टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. चेतेश्वर पुजारा मागील आयपीएल सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा सदस्य होता. यावर्षी झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला कुणीही खरेदी केले नाही. त्यानंतर त्यानं इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला तो भलताच फायदेशीर ठरला. टेस्ट टीममध्ये निवड झाल्यानंतर पुजारानं आयपीएलबाबत मत व्यक्त केलं आहे. ‘मी आयपीएलमध्ये असतो तर मला मॅच खेळायला मिळण्याची शक्यता कमी होती. मी फक्त नेट्समध्ये गेलो असतो आणि प्रॅक्टीस करून परतलो असतो. मॅचमध्ये बॅटींग करणे आणि नेट प्रॅक्टीस करणे यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे मला कांऊटी क्रिकेटमध्ये खेळण्याची ऑफर आली त्यावेळी मी तातडीनं त्याला होकार दिला. माझ्यासाठी बॅटींगमध्ये लय प्राप्त करणे आवश्यक होते. मुंबईच्या टीममध्ये अर्जुन तेंडुलकरला जागा नाही, ‘या’ खेळाडूच्या लहान भावाचा समावेश काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्सकडून खेळताना पुजाराने 7 इनिंगमध्ये त्याने 143.4 च्या सरासरीने 717 रन केले, यात त्याच्या नावावर दोन द्विशतकं आणि 4 शतकं होती. 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव टेस्ट होणार आहे. मागच्या वर्षी न झालेल्या सीरिजची ही अखेरची मॅच आहे. कोरोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली शेवटची टेस्ट स्थगित करण्यात आली होती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.