Home /News /sport /

मुंबईच्या टीममध्ये अर्जुन तेंडुलकरला जागा नाही, 'या' खेळाडूच्या लहान भावाचा समावेश

मुंबईच्या टीममध्ये अर्जुन तेंडुलकरला जागा नाही, 'या' खेळाडूच्या लहान भावाचा समावेश

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सदस्य असलेल्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) एकही संधी मिळाली नाही.

    मुंबई, 24 मे : आयपीएल 2022 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) आव्हान संपुष्टात आलंय. मुंबई इंडियन्सची या सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली. त्यांनी 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले. पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर असलेल्या मुंबईनं त्यांच्या 'प्लेईंग 11' मध्ये अनेक बदल केले. तरूण खेळाडूंचा टीममध्ये समावेश केला. पण, अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) एकही संधी मिळाली नाही. अर्जुननं सलग दुसरा आयपीएल सिझन बेंचवरच काढला. आयपीएलपाठोपाठ मुंबईच्या रणजी टीममध्येही अर्जुनची निराशा झाली आहे. 6 जूनपासून सुरू होणाऱ्या रणजी स्पर्धेच्या 'नॉक आऊट' राऊंडसाठी अर्जुनची मुंबईच्या टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. उत्तराखंड विरूद्ध होणाऱ्या क्वार्टर फायनलसाठी मुंबईच्या टीमची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये मुंबईचा रणजीपटू सरफराज खानचा लहान भाऊ मुशीर खानचा समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मुंबईच्या रणजी टीमचा कॅप्टन आहे. 18 वर्षांच्या मुशीरनं कुचबिहार ट्रॉफी स्पर्धेतील 9 मॅचमध्ये 67 च्या सरासरीनं 670 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 32 विकेट्सही घेतल्या आहेत. या स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबईला पोहचवण्यात मुशीरचे मोठे योगदान होते. मुंबईच्या अंडर 25 टीमकडूनही त्यानं 3 मॅचमध्ये 401 रन केले आहेत. यामध्ये मणिपूर विरूद्ध खेळलेल्या 267 रनचाही समावेश आहे. मुंबईच्या टीममध्ये निवड झाल्याबद्दल मुशीरनं आनंद व्यक्त केला आहे. 'मी आणि माझा भाऊ सरफराज यांचं भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळण्याचं आणि वडिलांना खूश करण्याचं स्वप्न आहे. माझ्या निवडीसाठी मी एमसीएचा आभारी आहे. ही सुरूवात असून अजून बराच मोठा प्रवास करणे बाकी आहे, ' अशी प्रतिक्रिया मुशीरनं दिली. मुशीरचा भाऊ सरफराज दिल्ली कॅपिटल्स टीमचा सदस्य असून त्यानं मुंबईच्या रणजी टीमकडून अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत. IPL 2022, GT vs RR : पहिल्या क्वालिफायरपूर्वी नेहरानं लगावली चहलला किक, पाहा Photo मुंबईची टीम : पृथ्वी शॉ (कॅप्टन), यशस्वी जैयसवाल, भूपेन लालवानी, अरमान जाफर, सरफराज खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तारे, हार्दिक तमोर, अमन खान, सैराज पाटिल, शम्स मुलानी, ध्रुमिल मटकर, तनूश कोटियन, शशांक अटर्डे, धवल कुलकर्णी , तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रोयस्तान डायस, सिद्धार्थ राऊत आणि मुशीर खान
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Arjun Tendulkar, Mumbai, Ranjit campionship

    पुढील बातम्या