मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : रोहित शर्माचं शतक हुकलं, क्रिकेट फॅन्सनी काढला संजय मांजरेकरवर राग

IND vs ENG : रोहित शर्माचं शतक हुकलं, क्रिकेट फॅन्सनी काढला संजय मांजरेकरवर राग

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसरी टेस्ट लॉर्ड्सवर सुरु आहे. या टेस्टमध्ये रोहित शर्माचं (Rohit Sharma) शतक हुकलं. रोहित आऊट होताच नेटीझन्सनी सारा राग त्यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या संजय मांजरेकरवर (Sanjay Manjrekar) काढला आहे.

पुढे वाचा ...

लॉर्ड्स, 13 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसरी टेस्ट लॉर्ड्सवर सुरु आहे. या टेस्टचा पहिला दिवस रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी गाजवला. राहुल पहिल्या दिवसाच्या अखेरीस 127 रनवर नाबाद आहे. तर रोहित शर्माचं विदेशातील पहिलं टेस्ट शतक 17 रननं हुकलं. रोहित आणि राहुल जोडीनं पहिल्या विकेटसाठी 126 रनची भागिदारी केली. रोहित शर्मा शतक झळकावणार असं वाटत असतानाच 83 रनवर आऊट झाला. तो आऊट होताच क्रिकेट फॅन्सनी संजय मांजेरकरला (Sanjay Manjrekar) ट्रोल केलं आहे.

मैदानात सेट झाल्यानंतर रोहितनं खराब बॉलचा समाचार घेत रन जमवले. सॅम करनला त्यानं विशेष लक्ष्य केले. त्याच्या 10 बॉलमध्येच रोहितनं 5 फोर लगावले. रोहितनं त्याचं अर्धशतक 83 बॉलमध्ये पूर्ण केले. त्यानंतरही रोहितचा ओघ सुरु होता. अखेर जेम्स अँडरसनच्या एका अप्रतिम बॉलवर रोहित आऊट झाला.

रोहितची बॅटींग पाहताना कॉमेंट्री करणारा संजय मांजेरकर भलताच आनंदी झाला होता. तो रोहितच्या खेळीची प्रशंसा करत असतानाच अँडसनच्या बॉलवर रोहित आऊट झाला. हिटमॅन आऊट होताच नाराज झालेल्या फॅन्सनी सर्व राग मांजरेकरवर काढला.

टीम इंडियानं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 276 रन केले आहेत. चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) खराब फॉर्म लॉर्ड्समध्येही सुरु आहे. पुजारानं फक्त 9 रन काढले. पुजारा आऊट झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीनं चांगली पार्टनरशिप केली.

IND vs ENG : सुनील शेट्टीनं केलं राहुलचं अभिनंदन! नेटीझन्स म्हणाले, 'सासरेबुवा तुम्ही...'

राहुल आणि विराट कोहली जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 117 रनची भागिदारी केली. ओली रॉबिन्सननं विराट कोहलीला 42 रनवर आऊट करत ही जोडी फोडली. विराट आऊट झाल्यानंतर राहुल आणि अजिंक्य राहाणेनं अधिक पडझड होऊ न देता उर्वरित खेळ खेळून काढला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 2 विकेट्स घेतल्या. तर ओली रॉबिन्सननं एक विकेट घेतली.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma