मुंबई, 13 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्टचा पहिला दिवस (India vs England 2nd Test) केएल राहुलनं (KL Rahul) गाजवला. राहुलनं टेस्ट कारकिर्दीमधील सहावं शतक झळकावलं. इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स टेस्टवर शतक झळकावणारा तो दहावा भारतीय आहे. तर रवी शास्त्रींनंतर शतक झळकावणारा पहिला भारतीय ओपनर आहे. राहुलनं 31 वर्षांनंतर या विक्रमाची बरोबरी केली आहे. राहुलच्या या शतकानंतर त्याचं अभिनंदन होत आहे. चित्रपट अभिनेता सुनील शेट्टीनं (Suniel Shetty) देखील राहुलच्या या शतकानंतर भलताच आनंदी झाला आहे. ‘क्रिकेटच्या मक्कमध्ये शतक. वेल प्लेयड बाबा’ असं ट्विट सुनील शेट्टीनं केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल झालंय. सुनील शेट्टीच्या या ट्विटनंतर नेटीझन्सनी त्याला राहुल आणि आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला आहे. ‘सासरेबुवा, तुम्ही याची वाट पाहत होता का?’ ‘आता हे नातं पक्क समाजावं का?’ असे प्रश्न त्यांनी सुनील शेट्टीला विचारले आहेत.
— Rofl_Baba (@aflatoon391) August 12, 2021
Lords mein century ka hi wait kar rahe the kya sasur ji?
— VK || SRKTIAN (@SRK_SRT) August 12, 2021
IND vs ENG : केएल राहुलनं सेहवागच्या दुप्पट वेगानं केली कमाल, वाचा ऐतिहासिक शतकाच्या 5 मोठ्या गोष्टी केएल राहुल आणि सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी यांच्या रिलेशनशिपची बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. पण या दोघांनीही याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या दोघांना यापूर्वी अनेकदा एकत्र पाहिलेलं आहे. तसेच ते सोशल मीडियावर देखील एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. आथिया शेट्टी राहुलसोबत इंग्लंडमध्ये असल्याचे काही फोटो यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

)







