• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची पत्नी झाली रोहितची फॅन, टीम इंडियाला दिला गंभीर इशारा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची पत्नी झाली रोहितची फॅन, टीम इंडियाला दिला गंभीर इशारा

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहित शर्मानं (Rohit Sharma) टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन काढले. रोहितच्या या खेळानं त्याच्या फॅन्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 15 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहित शर्मानं (Rohit Sharma) टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन काढले. ओव्हल टेस्टमध्ये रोहितनं शतक झळकावत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रोहितच्या या खेळानं त्याच्या फॅन्समध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियन बॅटर एलिसा हिली (Alyssa Healy) देखील रोहितची फॅन झाली असून तिनं आता भारतीय टीमला गंभीर इशारा दिला आहे. भारतीय महिला टीम (Indian Women Team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहित शर्मासारखा खेळ करणार असल्याचं हिलीनं जाहीर केलं आहे. हिली ही ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) पत्नी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 30 सप्टेंबरपासून डे-नाईट टेस्ट मॅच होणार आहे. या टेस्टमध्ये वन-डे सारखं खेळणार असल्याचं हिलीनं जाहीर केलं आहे. हिलीनं सांगितलं की, ' पिंक बॉल टेस्ट आव्हानात्मक असेल. मी आजवर चार टेस्ट मॅच खेळली आहे. त्यामुळे टेस्ट खेळण्याचा मला तितका सराव नाही. पण, टेस्ट क्रिकेटमध्य माझ्या वन-डेतील बॅटींगपेक्षा फार बदल होणार नाही. आधुनिक टेस्ट मॅचमध्ये खूप बदल झाला आहे. मला रोहित शर्मापासून प्रेरणा मिळाली. तो व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जगातील सर्वात खतरनाक बॅट्समन आहे. त्याचबरोबर टेस्ट क्रिकेटमधील यशस्वी ओपनिंग बॅट्समन देखील आहे. मला रोहितसारखं खेळण्याची इच्छा आहे. तो ज्या पद्धतीनं सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये चांगली बॅटींग करतो तसं मला जमेल का? याचा विचार मी करत आहे.' असं हिलीनं सांगितलं. IPL 2021: जुन्या रंगात परतला धोनी, हेलिकॉप्टर शॉट्सचा Video Viral भारताविरुद्धच्या सीरिजबद्दल हिलीनं सांगितलं की, 'भारतीय टीम खूप धोकादायक आहे. त्यांच्याबद्दल काही भविष्यवाणी करता येणार नाही. आम्ही आजवर कधीही न पाहिलेल्या खेळाडूंची त्यांनी निवड केली आहे. त्यांना नेहमीच नव्या खेळाडूंसह खेळायला आवडतं. त्यांच्या टीममधील पूनम यादव ही आमच्या विरुद्ध नेहमीच वेगळ्या पद्धतीनं बॉलिंग करते,' असं हिलीनं स्पष्ट केलं.
  Published by:News18 Desk
  First published: