Home /News /sport /

IPL 2021: जुन्या रंगात परतला धोनी, हेलिकॉप्टर शॉट्सचा Video Viral

IPL 2021: जुन्या रंगात परतला धोनी, हेलिकॉप्टर शॉट्सचा Video Viral

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) वलय आजही कायम आहे. त्याची बॅटींग गेल्या काही काळापासून फारशी चालली नाही. पण, आजही त्याची मॅच विनर अशी ओळख आहे.

    मुंबई, 15 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) वलय आजही कायम आहे. त्याची बॅटींग गेल्या काही काळापासून फारशी चालली नाही. पण, आजही त्याची मॅच विनर अशी ओळख आहे. आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) आनंदाची बातमी आहे. धोनी या स्पर्धेच्यापूर्वी जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. धोनीच्या बॅटींगचा एक व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सनं पोस्ट केला आहे. त्यामध्ये जुन्या शैलीमधील धोनी परतलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी यॉर्कर बॉलवर त्याचा ट्रेडमार्क असलेला हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यानं चेन्नईचा फास्ट बॉलर दीपक चहरच्या (Deepak Chahar) बॉलवर कव्हर्सच्या डोक्यावरुन एक जबरदस्त फोर देखील लगावला. धोनी सध्या गेल्या तीन वर्षातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो सध्या मोठे-मोठे सिक्स लगावतोय, असा इशारा चहरनं दिला आहे. महेंद्रसिंह धोनीची आक्रमक बॅटींग बराच काळापासून आयपीएलध्ये दिसलेली नाही. तो मागच्या सिझनमध्ये अपयशी ठरला होता. या सिझनमधील पहिल्या हाफमध्येही त्याची कामगिरी निरैशाजनक झाली. आयपीएल 2020 (IPL 2020) धोनीनं 14 मॅचमध्ये 25 सरासरीनं 200 रन काढले होते. त्याचा स्ट्राईक रेट 116 होता. तर या आयपीएलमध्ये त्यानं 12.33 च्या सरासरीनं 37 रन काढले आहेत. भारतीय क्रिकेटपटू होणार मालामाल, BCCI दिवाळीपूर्वी देणार बंपर गिफ्ट चेन्नई सुपरकिंग्सला मागील वर्षी 'प्ले ऑफ' गाठण्यात अपयश आले होते. त्यांनी या सिझनमध्ये चांगली कामगिरी केली  असून 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आता चेन्नईला 'प्ले ऑफ' गाठण्यासाठी उर्वरित 7 पैकी 3 सामने जिंकणे आवश्यक आहे. यंदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या धोनीच्या या टीमची पहिली लढत मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Csk, MS Dhoni, Video viral

    पुढील बातम्या