मोहाली, 20 सप्टेंबर: मोहाली ॉी20त 208 धावांचा डोंगर उभारुनही टीम इंडियाच्या गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दबाव आणला. आणि त्यामागे कारण ठरला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरुन ग्रीन. ग्रीननं हार्दिक पंड्याप्रमाणेच गोलंदाजांवर सुरवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. त्यानंही मोहालीच्या मैदानात चौफेर फटकेबाजी केली. पण ग्रीनची खेळी ही पाचव्याच ओव्हरमध्ये संपुष्टात आली असती. मात्र रोहित शर्माच्या एका निर्णयामुळे ग्रीनला भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली. डीआरएस न घेणं महागात सामन्याच्या पाचव्या ओव्हरमध्ये युजवेंद्र चहलचा बॉल ग्रीनच्या पॅडवर आदळला. सर्वांनी एलबीडब्ल्यूसाठी अपीलही केली. पण अम्पायरनी तो निर्णय फेटाळा. मात्र त्यानंतर डीआरएस घेण्यावरुन रोहित शर्मा, विराट कोहली आणि विकेट कीपर दिनेश कार्तिक एकमेकांकडे पाहत बसले. पण डीआरएस काही घेतला नाही. त्यानंतर टीव्ही रिप्लेत मात्र तो बॉल थेट स्टंप्सवर जाऊन लागत असल्याचं दिसलं.
A maiden T20I fifty off just 26 balls from Cameron Green 🤯#INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/Afs4NOJP1W pic.twitter.com/QFOKt36xaq
— ICC (@ICC) September 20, 2022
त्यावेळी ग्रीन अवघ्या 17 धावांवर खेळत होता. त्यानंतर 42 धावांवर असताना अत्रर पटेलनंही ग्रीनचं सोपं कॅच सोडलं. त्यामुळे ग्रीनला अर्धशतक करण्याची संधी मिळाली. ग्रीननं आपल्या ्इनिंगमध्ये 30 बॉल्समध्ये 8 फोर आणि 4 सिक्ससह 61 धावा फटकावल्या.