मुंबई, 27 नोव्हेंबर : आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (South Africa Corona Variant) जगभरात चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांनी आफ्रिकेत जाण्यावर आणि आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता आयसीसीने महिला क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायर 2021 (ICC Women’s World Cup Qualifier) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वेमध्ये क्वालिफायरचे सामने सुरू होते, पण हे सामने तात्काळ थांबवण्यात आले असल्याचं आयसीसीने सांगितलं आहे.
JUST IN: The ICC Women’s Cricket World Cup Qualifier in Zimbabwe has been called off due to Covid risk.
— ICC (@ICC) November 27, 2021
Details 👇https://t.co/VXQDhaI2Re
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नेदरलँड्सनेही अर्ध्यातच दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौराही संकटात सापडला आहे. पुढच्या महिन्यामध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.
South Africa and Netherlands have mutually agreed to postpone the ongoing #CWCSL ODI series.
— ICC (@ICC) November 27, 2021
Details 👇https://t.co/4NakdWlBol
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या बी.1.1.529 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. दौरा झाला तर खेळाडूंना मुंबईहून जोहान्सबर्गला चार्टर विमानाने पाठवलं जाईल, पण बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांना 3 ते 4 दिवस क्वारंटाईन व्हायला लागण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.