जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : टीम इंडियाची होणार आज निवड, रोहितला मिळणार मोठी जबाबदारी!

IND vs SA : टीम इंडियाची होणार आज निवड, रोहितला मिळणार मोठी जबाबदारी!

IND vs SA : टीम इंडियाची होणार आज निवड, रोहितला मिळणार मोठी जबाबदारी!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरिजसाठी (India vs South Africa) आज (बुधवारी) टीम इंडियाची निवड होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 डिसेंबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरिजसाठी (India vs South Africa) आज (बुधवारी) टीम इंडियाची निवड होणार आहे. भारतीय टीम या दौऱ्यात 3 टेस्ट खेळणार आहे. यामधील पहिली टेस्ट बॉक्सिंग डेच्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला खेळली जाणार आहे. 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या  वन-डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा नंतर करण्यात येण्याची शक्यता आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CAS) या दौऱ्यासाठी 21 सदस्यीय टीमची निवड मंगळवारीच जाहीर केली आहे. बायो-बबलमुळे बोर्डानं इतक्या मोठ्या प्रमाणात खेळाडूंची निवड केली आहे. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) भाग आहे. सेंच्युरीअन, वाँडर्स आणि न्यूसलँडमध्ये या टेस्ट होणार आहेत. टीम इंडियाला आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमला नवा इतिहास रचण्याची या दौऱ्यात संधी आहे.

जाहिरात

विराटच्या कॅप्टनसीमधील टीम इंडियानं नुकताच न्यूझीलंडचा  2 टेस्टच्या सीरिजमध्ये पराभव केला आहे. या सीरिजमधील दुसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये भारतीय क्रिकेट टीमने आजवरच्या त्यांच्या इतिहासात सर्वाधिक रनने विजय मिळवला होता.मुंबईत झालेल्या या टेस्टमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 372 रनने पराभव केला. रोहितला मिळणार जबाबदारी? दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) निवड होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यांची टीममधील जागा सुरक्षित मानली जात आहे. पण, टेस्ट टीमची व्हाईस कॅप्टनसी धोक्यात आली आहे. सलग 12 इनिंगमध्ये फेल गेल्यानं त्याच्या प्लेईंग 11 मधील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Hardik Pandya आता आणखी एका टूर्नामेंटमधून बाहेर, समोर आले मोठे कारण अजिंक्य रहाणेला व्हाईस कॅप्टनपदावरून हटवल्यास रोहित शर्माला (Rohit Sharma) ही जबाबदारी मिळू शकते. रोहित टी20 टीमचा कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला होता. 100 पेक्षा जास्त टेस्ट मॅच खेळलेला टीम इंडियाचा फास्ट बॉलर इशांत शर्माची या दौऱ्यासाठी निवड अनिश्चित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात