मुंबई, 23 नोव्हेंबर : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-20 सीरिज भारतानं जिंकली असून तीन मॅचची वन-डे सीरिज खेळणं बाकी आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, ऑल राउंडर खेळाडू रवींद्र जडेजाच्या फिटनसेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश टेस्ट सीरिजसाठी रवींद्र जडेजा अनफिट आहे. त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेला मुकावं लागणार आहे. जाडेजा आऊट कुलदीपला संधी टीममध्ये ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन, डावखुरा स्पिन बॉलर अक्षर पटेल आणि चायनामन स्पिन बॉलर कुलदीप यादव हे उपलब्ध असतील. त्यामुळे चौथा स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून शाहबाज अहमदची निवड करण्यात आली आहे. टी20 नाही पण वन डेत तरी ‘या’ खेळाडूला संधी? धवनच्या भारतीय संघात हे 6 बदल निश्चित चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने तंदुरुस्त होईल हे गृहित धरून त्याचा टीममध्ये समावेश केला होता. पण आता तो अनफिट झाल्यानं त्याची जागा शाहबाज अहमद घेईल. तर दुसरीकडे यश दयाल या युवा खेळाडूलाही पहिल्यांदाच भारतीय संघात जागा मिळाली होती. पण त्यालाही दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्याला मुकावं लागणार आहे. त्याच्याजागी कुलदीप सेनची निवड करण्यात आली आहे. पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर का भडकला हार्दिक पंड्या? मॅच संपल्यानंतर पाहा काय घडलं… भारताचा बांगलादेश दौरा टीम इंडियाला बांगलादेश दौऱ्यात दोन टेस्ट आणि तीन वन-डे मॅचेस खेळायच्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक मजबूत टीम या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वन-डे सीरिजनंतर 14 ते 18 डिसेंबर दरम्यान चितगाव आणि 22 ते 26 डिसेंबर दरम्यान मीरपूर येथे टेस्ट मॅच खेळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.