Home /News /sport /

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत भारतीय बॅटरची कमाल, अजिंक्य रहाणेची जागा घेण्यासाठी सज्ज

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत भारतीय बॅटरची कमाल, अजिंक्य रहाणेची जागा घेण्यासाठी सज्ज

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड आज (बुधवारी) होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या दमदार कामगिरी करणारा भारतीय या सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेची जागा घेण्यास सज्ज झाला आहे.

    मुंबई, 8 डिसेंबर : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी (India tour of South Africa)  इंडिया ए टीम तिथं क्रिकेट सीरिज खेळत आहे. इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए (India  A vs South Africa A) यांच्यातील सीरिजमध्ये हनुमा विहारीनं (Hanuma Vihari) सलग तिसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये विहारीचा टीमममध्ये समावेश करण्यात आला नव्हता. विहारीनं त्याच्या बॅटनं निवड समिताला चोख उत्तर दिले आहे. दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या अनधिकृत टेस्टमध्ये विहारी आणि इशान किशन (Ishan Kishan) यांच्या अर्धशतकामुळे इंडिया ए ' मंगळवारी दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 6 आऊट 229 रन केले. इशान 86 रनवर खेळत आहे. तर विहारी 63 रन काढून आऊट झाला. विहारी आणि इशाननं पाचव्या विकेटसाठी 117 रनची पार्टनरशिप करत भारतीय टीमला संकटातून बाहेर काढले. आफ्रिकेनं पहिल्या इनिंगमध्ये 268 रन केले आहेत. हनुमा विहारी देखील अजिंक्य रहाणेसारखा (Ajinkya Rahane) मिडल ऑर्डरचा बॅटर आहे.  विहारीचा फॉर्म पाहता विराट कोहली (Virat Kohli) त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करू शकतो. विहारीनं 96 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 55 च्या सरासरीनं 7401 रन काढले आहेत. यामध्ये 21 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहेत. त्याने त्रिशतक देखील झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या नव्या कॅप्टनचा धडाका, इंग्लंड पहिल्या इनिंगमध्ये झटपट ALL OUT फर्स्ट क्लास क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे विहारीला 2018 साली इंग्लंड विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आजवर 12 टेस्टमध्ये 32.84 च्या सरासरीनं 624 रन केले आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात विहारीच्या चिवट खेळाचा मोठा वाटा होता. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड आज (बुधवारी) होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, South africa, Team india

    पुढील बातम्या