ब्रिस्बेन, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं (Pat Cummins) कॅप्टन म्हणून जोरदार सुरूवात केली आहे. अॅशेस सीरिज (Ashes Series) सुरू होण्यापूर्वी टीम पेनला (Tim Paine) टेस्ट टीमच्या कॅप्टनसीचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याच्या जागी कमिन्सची नियुक्ती करण्यात आली. कमिन्सची कॅप्टन म्हणून पहिली परीक्षा बुधवारी सुरू झाली. ब्रिस्बेनमध्ये सुरू झालेल्या या परिक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये कमिन्सनं घवघवीत यश मिळवलं आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील अॅशेस सीरिजला बुधवारी ब्रिस्बेनमध्ये सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी कमिन्सनं भेदक बॉलिंग करत इंग्लंडची निम्मी टीम आऊट केली. कमिन्सच्या बॉलिंगमुळे इंग्लंडची पहिली इनिंग 147 रनवर ऑल आऊट झाली. मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. तर कॅमेरून ग्रीननं 1 विकेट घेतली.
What a start for Pat Cummins as Test skipper, he finishes with a five-wicket haul as England are bowled out for 147 💥
Watch the #Ashes on https://t.co/MHHfZPQi6H (in selected regions)!#WTC23 | #AUSvENG | https://t.co/pR2hqnzR22 pic.twitter.com/YmWQzyJKaO — ICC (@ICC) December 8, 2021
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्लच्या अटॅकपुढे इंग्लंडचा एकही बॅटर मोठा स्कोअर करू शकला नाही. इंग्लंडकडून जोस बटलरनं (Jos Buttler) सर्वात जास्त 39 रन केले. या वर्षी फॉर्मात असलेला इंग्लंडचा कॅप्टन जो रूट (Joe Root) शून्यावर आऊट झाला. त्याला हेजलवूडने आऊट केले. रूटने यावर्षी 13 टेस्टमध्ये 6 सेंच्युरीसह 1455 रन केले आहेत. भारताविरुद्ध चेन्नई टेस्टमध्ये द्विशतक करणाऱ्या रूटने इंग्लंडमध्येही टीम इंडियाला चांगलाच त्रास दिला होता. जबरदस्त फॉर्मात असलेला रूट यावर्षी पहिल्यांदाच शून्यावर आऊट झाला आहे.
वेस्ट इंडिजवर बरसले 'वीरू'चे 'शोले', सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे
जो रूटसह रॉरी बर्न्स आणि ओली रॉबिन्सन हे इंग्लंडचे आणखी 2 खेळाडू शून्यावर आऊट झाले. इंग्लंडचे टॉप 7 बॅटर्स या वर्षभरात 29 वेळा शून्यावर आऊट झाले आहेत. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. यापूर्वी 1988 साली इंग्लंडच्याच खेळाडूंनी 27 वेळा शून्यावर आऊट होत रेकॉर्ड केला होता. 23 वर्ष जूना हा रेकॉर्ड यंदा त्यांनीच मोडला आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा रूटचा निर्णय टीमच्या चांगल्याच अंगाशी आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.