मुंबई, 18 ऑगस्ट : टीम इंडियानं इंग्लंड दौऱ्यात (India vs England Test Series) जोरदार खेळ करत लॉर्ड्स टेस्ट जिंकली आहे. या विजयानंतरही विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म काळजीचा विषय आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये फ्लॉप झाल्यानंतर लॉर्ड्सवरही अर्धशतक झळकवण्यात विराट अपयशी ठरला. सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) विराट कोहलीच्या खराब फॉर्मचं कारण सांगितलं आहे. त्याचबरोबर लॉर्ड्स टेस्टमध्ये पूल लगावत आऊट झालेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) बाबतही सचिननं मोठं वक्तव्य केलं आहे. सचिननं पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘विराटची सुरुवात चांगली होत नाहीय. त्याच्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे त्याच्याकडून चुका होता आहेत. चांगली सुरुवात मिळाली नाही तर मनात अनेक गोष्टी सुरु होतात. त्यामुळे डोक्यातील काळजी वाढते. ही गोष्ट सर्वांच्या बाबतीमध्ये होते, असे सचिनने सांगितले. रोहितबद्दल म्हणाला… सचिनला यावेळी रोहित शर्माच्या बॅटींगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सचिन म्हणाला की, ‘मी जो काही खेळ पाहिलाय त्यावरुन त्याच्या खेळात सुधारणा झाली आहे, असं मला वाटतं. परिस्थितीनुसार बॅटींग करु शकतो, हे रोहितनं दाखवून दिलं आहे. त्यानं केएल राहुलला समर्थ साथ दिली. पूल शॉटचा विषयावर बोलायचं असेल तर त्याने या प्रकारच्या अनेक शॉट्सवर बॉल बाऊंड्रीच्या बाहेर मारला आहे.’ असं सांगत सचिननं रोहितचा बचाव केला. कॅन्सरवर मात करत जिंकलं Tokyo Olympics मध्ये मेडल, 93 लाखांमध्ये केला लिलाव! वाचा काय आहे कारण सचिन तेंडुलकरने इंग्लंडची रणनिती आणि त्यांच्या बॅटिंगवर टीका केली आहे. भारतीय बॉलर्सचं आक्रमण पाहून इंग्लंडचे खेळाडू घाबरले आहेत. भारताच्या बॉलिंगसमोर इंग्लंडचे खेळाडू हैराण दिसत आहेत. जो रूटने जेव्हा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला तेव्हा मी हैराण झालो. इंग्लंडची टीम भारताच्या फास्ट बॉलिंग आक्रमणाला घाबरली आहे, हेदेखील यावरून दिसून आलं. हवामानाने साथ दिली तर भारत ही टेस्ट मॅच जिंकेल, हे मी माझ्या मित्राला शुक्रवारी सकाळी 8 वाजता सांगितलं. भारताच्या ओपनरनाही याचं श्रेय मिळालं पाहिजे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली.’ असं सचिननं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.