मुंबई, 3 फेब्रुवारी : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वन-डे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया संकटात आली आहे. टीम इंडियातील 4 खेळाडूंसह 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय टीममधील श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) हे चार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील 3 सदस्य अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय टीममधील ही आणिबाणीची परिस्थिती लक्षात घेता मयांक अग्रवालचा (Mayank Agarwal) टीममध्ये ताततीने समावेश करण्यात आला आहे. शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड हे रोहित शर्माचे दोन्ही सलामीचे जोडीदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर केएल राहुल (KL Rahul) पहिल्या वन-डेसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे मयांकचा समावेश करण्यात आला आहे. रोहितसह तो पहिल्या वन-डेमध्ये इनिंगची सुरूवात करू शकतो. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सीरिज 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज टीमचे अहमदाबादमध्ये आगमन झालं आहे. रोहित शर्मा वन-डे टीमचा पूर्ण वेळ कॅप्टन झाल्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिका रोहित दुखापतीमुळे खेळला नव्हता. U-19 World Cup: टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव, तब्बल 8व्यांदा टीमची फायनलमध्ये एन्ट्री भारताची वन-डे टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मयांक अग्रवाल वेस्ट इंडिजची वन-डे टीम : कायरन पोलार्ड (कर्णधार), केमार रोच, एनक्रुमाह बोनर, ब्रँडन किंग, फॅबियन एलेन, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अलझारी जोसेफ, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनिअर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.