मुंबई, 3 फेब्रुवारी: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. आरसीबीला यापूर्वीच्या चुका टाळण्याची मोठी संधी मिळणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये आयपीएल 2022 साठी मेगा ऑक्शन (IPL Auction 2022) होत आहे. या ऑक्शनमध्ये तगडी टीम निवडून स्पर्धेतील काम हलकं करण्याचा आरसीबीचा निश्चय आहे. आरसीबीनं या ऑक्शनपूर्वी विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) या तीन खेळाडूंना रिटेन केले आहे. विराटने मागील आयपीएल सिझनमध्ये आरसीबीच्या इनिंगची सुरूवात केली होती. आगामी सिझनमध्येही विराटला तीच भूमिका मिळण्याची शक्यता आहे. विराटचा ओपनिंग पार्टनर म्हणून 3 खेळाडूंवर आरसीबीची विशेष नजर असेल. इशान किशन (Ishan Kishan): मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळलेला हा विकेट किपर-बॅटर यंदा लिलावासाठी उपलब्ध आहे. पॉवर प्लेमध्ये आक्रमक खेळ खेळण्याची इशानची क्षमता आहे. मागील सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या मॅचमध्ये आक्रमक 84 रन करत त्याने ती दाखवून दिली आहे. इशानने आयपीएल 2020 मध्ये सर्वाधिक 30 सिक्स लगावले होते. टीम इंडियाचे भवितव्य म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे विराटचा पार्टनर म्हणून इशान ही आरसीबीची पहिली पसंती असेल. फाफ ड्यू प्लेसिस (Faf Du Plessis): दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी खेळाडूसाठी आयपीएल 2021 जबरदस्त ठरले. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) 16 मॅचमध्ये 138.20 च्या स्ट्राईक रेटनं 633 रन केले. सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटरला दिल्या जााणाऱ्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये तो ऋतुराज गायकवाडपेक्षा फक्त 2 रन मागे होता. फाफचा फॉर्म आणि अनुभव याचा विचार करता विराटचा भक्कम ओपनिंग पार्टनर म्हणून आरसीबी त्याच्यावर बोली लावू शकते. ‘बायो-बबल’मध्ये ठरणार टीमचं भवितव्य, फ्रँचायझींना करावं लागणार 10 नियमांचं पालन देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal): देवदत्त पडिक्कल मागील दोन सिझन आरसीबीकडेच होता. त्यानं या काळात ओपनिंगला चांगला ठसा उमटवला आहे. त्याने मागील आयपीएल सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध आयपीएल कारकिर्दीमधील पहिले शतक झळकावले होते. विराट आणि त्याच्यात उत्तम ताळमेळ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हीच जोडी आगामी आयपीएलमध्ये खेळवण्याबाबत आरसीबी विचार करू शकते. त्याचबरोबर तो बंगळुरूचा असल्यानं स्थानिक फॅन्सना खूश करण्यासाठीही त्याच्या नावावर आरसीबी प्राधान्यानं विचार करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







