मुंबई, 11 जून: शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली टीम इंडिया (Team India) पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 3 वन-डे आणि 3 टी 20 सामन्यांचा हा दौरा आहे. या दौऱ्यासाठी 20 सदस्यीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर पाच नेट बॉलर्सचा समावेश करण्यात आला आहे. इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि सिमरजीत सिंह (Simarjeet Singh) हे पाच जण नेट बॉलर्स म्हणून टीम इंडियाबरोबर श्रीलंकेत जातील.
या पाच जणांमध्ये अशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह आणि साई किशोर हे आयपीएल टीमचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे चेहरे आणि खेळ क्रिकेट फॅन्सना माहिती आहे. पण या दौऱ्यात एक नाव सर्वांसाठी नवं आहे, ते म्हणजे सिमरजीत सिंह. 23 वर्षांच्या उजव्या हाताने बॉलिंग करणाऱ्या या मध्यमगती बॉलरचा श्रीलंका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला आहे. दिल्लीचा हा बॉलर पहिल्यांदाच सीनियर टीमचा सदस्य बनला आहे.
2018 मध्ये केले होते पदार्पण
सिमरजीतनं विजय हजारे ट्रॉफीच्या मागील सिझनमध्ये 28.45 ची सरासरी आणि 5.65 च्या इकोनॉमी रेटनं 11 विकेट्स घेतले होते. तो या सिझनमध्ये दिल्लीकडून संयुक्त रुपाने दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर होता. त्याने सप्टेंबर 2018 मध्ये सौराष्ट्र विरुद्धच्या लढतीमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विराट कोहलीसमोर आहेत 3 मुख्य प्रश्न, योग्य उत्तरं शोधली तर मिळणार विजेतेपद
सिमरजीतनं दिल्लीकडून 10 फर्स्ट क्लास, 19 लिस्ट ए आणि 15 टी 20 मॅच खेळल्या आहेत. त्याच्या नावावर 37 फर्स्ट क्लास, 19 लिस्ट ए आणि 18 टी 20 विकेट्स आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने पाच वेळा चार विकेट्स आणि एक वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये एकदा चार विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Delhi, India Vs Sri lanka, Shikhar dhavan, Team india