मुंबई, 12 जून : श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये सहा नव्या खेळाडूंची निवड झाली आहे. या टीममध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal), चेतन सकारिया (Chetan Sakariya), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), नितीश राणा (Nitish Rana) आणि कृष्णप्पा गौतम (K. Gowtham) या सहा जणांना पहिल्यांदा संधी देण्यात आलीय. यापैकी ऋतुराज हा भारतीय टीममधील नवा मराठी चेहरा असून संघात निवड झालेला पहिला पिंपरी चिंचवडचा (Pimpari Chinchwad) खेळाडू आहे. टीममध्ये निवड होताच ऋतुराज भावुक झाला आहे. काय म्हणाला ऋतुराज? ऋतुराजने या विषयावर बोलताना सांगितले की, “ मी खूप आनंदी आहे. मला ज्या क्षणी पहिल्यांदा समजलं त्यावेळी डोळ्यासमोर आजवरचे सर्व करियर आले. हा माझ्यासाठी खूप भावुक क्षण आहे. या प्रवासात ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचा विचार मी करत आहे. माझे आई-वडील, मित्र आणि कोच या सर्वांसाठीच हा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे.” ‘हे’ मोठे बलस्थान ऋतुराजनं 59 लिस्ट A मॅचमध्ये 47 पेक्षा जास्त सरासरीनं रन काढले आहेत. त्याचा टी20 क्रिकेटमधील स्ट्राईक रेट 130 पेक्षा जास्त आहे. “कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणे ही माझी शक्ती मूळ आहे. टीमच्या गरजेनुसार मी खेळू शकतो. अवघड परिस्थितीमधून बाहेर काढणे आणि आक्रमक खेळणे या दोन्ही गोष्टी मी करु शकतो. हे माझे सर्वात मोठे बलस्थान आहे.” असे ऋतुराजने सांगितले. VIDEO : जेव्हा बॉलरला मारण्यासाठी धावला होता मियांदाद, किरण मोरेची केली होती नक्कल पुन्हा द्रविडकडून शिकण्याची संधी महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) तालमीत आयपीएलमध्ये तयार झालेल्या ऋतुराजने राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. द्रविड श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असेल. “इंडिया अंडर-19, आणि ए टीममध्ये मी त्यांच्या हाताखाली शिकलो आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मर्यादीत संधी मिळणार आहे, त्यामध्ये राहुल सरांकडून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करेल,’’ असे ऋतुराजने स्पष्ट केले. 13 जुलैपासून भारताच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी-20 खेळणार आहे. शिखर धवन या टीमचा कॅप्टन असून भुवनेश्वर कुमार व्हाईस कॅप्टन आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.