मुंबई, 28 फेब्रुवारी : लाहोर कलंदर्सची (Lahore Qalandars) टीम पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेची नवी चॅम्पियन बनली आहे. लाहोरनं फायनलमध्ये (Pakistan Super League Final 2022) मुलतान सुलतानचा 42 रननं पराभव केला. शाहीन आफ्रिदीच्या (Shaheen Afridi) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या टीमनं फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटींग करत 5 आऊट 180 रन केले. त्याला उत्तर देताना मोहम्मद रिझवानची (Mohammad Rizwan) मुलतान टीम 138 रनवरच आटोपली. याबरोबरच शाहीन आफ्रिदी सर्वात कमी वयामध्ये टी20 लीग जिंकणारा कॅप्टन बनला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) नावावर हा रेकॉर्ड होता. त्याने 2012 साली 22 वर्ष 240 दिवस वय होते त्यावेळी सिडनी सिक्सर्ससाठी बिग बॅश स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर रोहित शर्मानं (Rohit Sharma) 26 व्या वर्षी 2013 साली मुंबई इंडियन्सला आयपीएल चॅम्पियन बनवले होते. आफ्रिदीनं 21 वर्ष 327 दिवस इतके वय असताना टी20 लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याला या सिझनमध्ये पहिल्यांदाच कॅप्टन बनवण्यात आले होते.
हाफिजची ऑल राऊंड कामगिरी लाहोरकडून सिनिअर खेळाडू मोहम्मद हाफीजनं ऑल राऊंड कामगिरी केली. लाहोरची सुरूवात 3 आऊट 25 अशी खराब झाली होती. त्यावेळी हाफीजनं 46 बॉलमध्ये 69 रन करत टीमला सावरले. हाफीजनं 9 फोर आणि 1 सिक्स लगावला. हॅरी ब्रुकनं 22 बॉलमध्ये नाबाद 41 तर डेव्हिड विसनं 8 बॉलमध्ये नाबाद 28 रन करत लाहोरचा स्कोअर 180 पर्यंत पोहचवला. IND vs SL : श्रेयसचा ट्रिपल धमाका, न्यूझीलंड-वेस्ट इंडिजनंतर लंकाही व्हाईटवॉश मुलतानची सुरूवात खराब झाली. टॉप ऑर्डरनं त्यांची अवस्था 4 आऊट 50 अशी झाली होती. कॅप्टन मोहम्मद रिझवाननं फक्त 14 रन केले. टीम डेव्हिडनं 27 तर खुशदिल शाहनं 32 रन करत टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची सपूर्ण टीम 19.3 ओव्हर्समध्ये 138 रन करत ऑल आऊट झाली. मोहम्मद हाफिजनं 4 ओव्हर्समध्ये 23 रन देत 2 विकेट्स घेतल्या. तर शाहीन आफ्रिदीला 3 विकेट्स मिळाल्या.