मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : 2021 ला निरोप देताना विराट कोहलीनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला...

IND vs SA : 2021 ला निरोप देताना विराट कोहलीनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला...

भारतीय क्रिकेट टीमनं (Team India) 2021 चा शेवट गोड केला आहे. टीम इंडियानं सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs South Africa) दक्षिण आफ्रिकेचा 113 रननं पराभव केला. या विजयानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) मोठं वक्तव्य केले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 31 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीमनं (Team India) 2021 चा शेवट गोड केला आहे. टीम इंडियानं सेंच्युरियनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs South Africa) दक्षिण आफ्रिकेचा 113 रननं पराभव केला. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतही भारतीय टीमनं विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सेंच्युरियनमध्ये टीम इंडियानं वर्षाच्या शेवटी यश मिळवलं आहे. टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) या विजयानंतर टीम इंडियाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

विराटनं 'बीसीसीआय डॉट टीव्ही' शी बोलताना सांगितले की, 'दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही ठिकाणी टेस्ट मॅच खेळणे सोपे नाही. सेंच्युरियन तर यामधील सर्वात अवध जागा आहे. भारतीय बॅटर्सनी पहिल्या इनिंगमध्ये चांगला खेळ केला. तर फास्ट बॉलर्सनी मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या. आम्ही चार दिवसांमध्ये मॅचचा निकाल लावला. आमच्या टीमचे मजबुतीचे हे उदाहरण आहे.

आमची टीम नेहमीच विजयाच्या शोधात असते. आम्ही याच पद्धतीनं क्रिकेट खेळतो. कोणत्याही मॅचमधील कोणत्याही परिस्थितीचा पूर्ण फायदा उठवण्याचा आमचा प्रयत्न असतो,' असे कोहलीने स्पष्ट केले. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेत आजवर एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. यंदा सीरिज जिंकण्याची मोठी संधी असल्याचं विराटनं सांगितलं.

'ही खूप चांगली परिस्थिती आहे. आम्ही विदेशात खेळतोय आणि 1-0 नं पुढे आहोत.  प्रतिस्पर्धी टीमला दुसऱ्या टेस्टमध्ये दबावात ठेवण्याची आमच्याकडे सुवर्णसंधी आहे. प्रत्येक खेळाडू यावर लक्ष देत आहे. वाँडर्ससाठी स्टेज सज्ज आहे. आम्ही तिथं सकारात्मक वृत्तीनं खेळणार आहोत.'

IND vs SL: टीम इंडियातील 'पुणेकर'चा जलवा, फायनलमध्ये श्रीलंकेची दाणादाण

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील भारतीय टीमच्या यशावर विराटनं सांगितलं की, 'प्रत्येक मॅचमध्ये टीम आणखी आत्मविश्वासासह उतरत आहे. आम्ही क्रिकेट कसं खेळलो, यावर विचार करण्यासाठी नवीन वर्ष ही चांगली संधी आहे. माझ्या मते मागील दोन-तीन वर्षांत आम्ही विदेशात चांगलं क्रिकेट खेळलो आहोत. आमची टीम ही अधिक चांगली आणि आत्मविश्वास असलेली होत आहे.

First published:
top videos

    Tags: South africa, Team india, Virat kohli