मुंबई, 30 डिसेंबर : अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या (Under 19 Asia Cup) फायनलमध्ये सध्या भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात लढत सुरू आहे. या लढतीत पहिल्यांदा बॅटींगला उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली आहे. टीम इंडियातील पुणेकर कौशल तांबे (Kaushal Tambe) याने सुरुवातीला दिलेल्या धक्क्यामुळे श्रीलंकेनं 30 ओव्हर्सच्या आत 7 विकेट्स गमावल्या आहेत. श्रीलंकेला चौथ्याच ओव्हरमध्ये रवी कुमारनं पहिला धक्का दिला. त्यानंतर कौशल तांबेनं 2 झटपट विकेट्स घेत लंकेला बॅक फुटवर ढकललं. त्यानंतर भारतीय बॉलर्सच्या अचूक माऱ्यापुढे श्रीलंकेची टॉप ऑर्डर झटपट कोसळली. त्यांची निम्मी टीम फक्त 47 रनवर आऊट झाली होती. त्यानंतर पुढील 10 रनमध्ये लंकेनं आणखी दोन विकेट्स गमावल्या.
India U19 are on a roll with the ball! 👌 👌
— BCCI (@BCCI) December 31, 2021
Vicky Ostwal, Kaushal Tambe, Raj Bawa and Ravi Kumar share the spoils. 👏👏 #BoysInBlue
Sri Lanka U19 seven down. #ACC #U19AsiaCup #INDvSL
📸 📸: ACC
Follow the match ▶️ https://t.co/GPPoJpzNpQ pic.twitter.com/nbcyvpgbfH
कोण आहे कौशल? आशिया कप फायनलमध्ये 2 झटपट विकेट्स घेणारा कौशल तांबे हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरचा (Junnar, Pune) खेळाडू आहे. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत त्यानं बॅट आणि बॉलनं चांगली छाप पाडली आहे. त्यानं 4 मॅचमधील 3 इनिंगमध्ये 35 च्या सरासरीनं 70 रन केले आहेत. तसंच 4 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतील कौशलनं लोअर ऑर्डरमध्ये चांगली बॅटींग केली होती. आगामी अंडर 19 वर्ल्ड कपसाठी कौशलचा हा फॉर्म उपयुक्त ठरणार आहे. IND vs SA : वन-डे टीमची घोषणा लवकरच, रोहित शर्माच्या निवडीबाबत वाचा Update श्रीलंकेनं सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. तर टीम इंडियानं या स्पर्धेतील 9 सिझनपैकी 8 वेळा फायनलमध्ये प्रवेश केला असून त्यामधील 7 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.