मुंबई, 4 जून : आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची टीम भारतामध्ये आली आहे. दोन्ही देशांमध्ये 5 टी20 सामन्यांची मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2022) दक्षिण आफ्रिकेचे 16 खेळाडू खेळले. यापैकी डेव्हिड मिलरचं (David Miller) गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान होतं. दक्षिण आफ्रिकेच्या 16 खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळाली असली तरी त्यांच्या लिमिटेड ओव्हर्स टीमचा कॅप्टन तेम्बा बऊमाला (Temba Bavuma) कोणत्याही टीमनं खरेदी केले नव्हते.
भारत दौऱ्यावर असलेल्या बऊमाचं आयपीएलमध्ये खेळण्याचं आणि आयपीएल टीमची कॅप्टनसी करण्याचं स्वप्न आहे. बऊमानं 'क्रिकेट मंथली' शी बोलताना या स्वप्नाबाबत सांगितले आहे. 'मला आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा आहे. माझी कामगिरी जितकी चांगली होईल, तितकं मी या स्पर्धेत खेळण्याची शक्यता वाढेल. आयपीएल टीमची कॅप्टनसी करण्याचं माझं स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मला एखाद्या आयपीएल टीमकडून खेळण्याची गरज आहे,' असे बऊमाने सांगितले.
क्विंटन डी कॉकनं राजीनामा दिल्यानंतर बऊमाची आफ्रिकेच्या वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने आजवर 51 टेस्टमध्ये 2612, 19 वन-डेमध्ये 722 आणि 21 टी20 इंटरनॅशनलमध्ये 501 रन केले आहेत. बवूमाच्या कॅप्टनसीमध्येच यावर्षी दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाचा वन-डे मालिकेत 3-0 असा पराभव केला होता.
On This Day : शेन वॉर्ननं टाकला 'बॉल ऑफ द सेंच्युरी', एका रात्रीत बनला स्टार! पाहा VIDEO
दक्षिण आफ्रिकेची टीम
टेम्बा बऊमा, क्विंटन डिकॉक, रिझा हेन्ड्रीक्स, हेनरिक क्लासीन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्किया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टियन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को जेनसन
भारतीय टीम
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.