मुंबई, 4 जून : क्रिकेटच्या इतिहासात 29 जून हा दिवस खूप खास आहे. 4 जून 1993 रोजी याच दिवशी (On This Day) ऑस्ट्रेलियाचा दिवंगत लेग स्पिनर शेन वॉर्ननं (Shane Warne) एक बॉल टाकला. त्या बॉलला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' असे म्हंटले जाते. इंग्लंड विरूद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या अॅशेस टेस्टच्या सीरिजमध्ये वॉर्ननं टाकलेला तो बॉल आजही फॅन्सच्या लक्षात आहे. वॉर्ननं त्या बॉलवर इंग्लंडचा अनुभवी क्रिकेटपटू माईक गॅटींगला आऊट केलं. त्यानंतर शेन वॉर्ननं एका रात्रीतून स्टार बनला.
1993 साली अॅलन बॉर्डरच्या कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियन टीम इंग्लंडमध्ये अॅशेस सीरिज खेळण्यासाठी गेली होती. त्या सीरिजची पहिली टेस्ट मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होती. इंग्लंडचा कॅप्टन ग्रॅहम गूचनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 289 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून मार्क टेलरनं सर्वात जास्त 124 रन केले. इंग्लंडकडून पीटर सचनं 6 विकेट्स घेतल्या.
बॉल ऑफ द सेंच्युरी का?
मँचेस्टर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 4 जून 1993 रोजी वॉर्ननं बॉल ऑफ द सेंच्युरी टाकला. शेन वॉर्ननं त्याच्या स्पेलमधील पहिलाच बॉल लेग स्पिन टाकला. तो बॉल लेग स्टम्पच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर 90 अंशामध्ये वळाला आणि माईक गॅटींगचा ऑफ स्टम्प उडाला. तो बॉल पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला होता. क्रिकेट विश्वात या पद्धतीनं बॉल कधीही वळाला नव्हता. त्यामुळे त्या बॉलला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' असे जाहीर करण्यात आले.
शेन वॉर्नचाही त्या बॉलवर विश्वास बसला नव्हता. मी जाणीवपूर्वक तो बॉल टाकला नव्हता. 'मी फक्त लेग स्पिन करत होतो. तो बॉल बॉल या पद्धतीनं वळेल असं मला वाटलं नाही. मी पुन्हा तसा बॉल कधीही टाकू शकणार नाही.' असं वॉर्ननं नंतर अनेकदा सांगितलं होतं. या बॉलनं त्याला एका रात्रीतून स्टार केले. क्रिकेट विश्वात महान लेग स्पिनरचा उदय झाला होता.
ENG vs NZ : राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूचा चिवट प्रतिकार, दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडचं वर्चस्व
शेन वॉर्नचे मार्च महिन्यात वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनानंतर 'बॉल ऑफ द सेंच्युरी' चा हा पहिलाच वार्षिक दिन आहे. या निमित्तानं क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा वॉर्नच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.