मुंबई, 10 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी आणि शेवटची टेस्ट केपटाऊनमध्ये मंगळवारपासून सुरू होत आहे. टीम इंडिया (Team India) या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरीत आहे. भारतीय टीमनं सेंच्युरियन टेस्ट जिंकली. तर आफ्रिकेने जोहान्सबर्गमध्ये बरोबरी साधली. आता केपटाऊनमध्ये होणाऱ्या निर्णायक टेस्टपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गारने (Dean Elgar) टीम इंडियाला गंभीर इशारा दिला आहे. एल्गारने जोहान्सबर्गमध्ये झालेली दुसरी टेस्ट जिंकण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. चौथ्या इनिंगमध्ये 240 रनचा पाठलाग करताना त्याने नाबाद 96 रन काढले. यावेळी एल्गारला अनेकदा बॉल लागला. तरीही तो मैदानावर उभा होता. दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो परतला. एल्गारने आता टीम इंडियाला इशारा दिला आहे. ‘आमच्यासाठी तिसरी टेस्ट खूप महत्त्वाची आहे. आम्ही जोहान्सबर्ग प्रमाणेच इथेही खेळलो तर तिसरी टेस्ट जिंकणार हे नक्की आहे. केपटाऊनमध्ये फास्ट बॉलिंग हे आमचे मुख्य शस्त्र असेल. केपटाऊनच्या पिचवर टीम इंडियाला अडचणीत टाकतील असे फास्ट बॉलर आमच्याकडे आहेत, याचा मला विश्वास आहे.’ भारतीय बॅटरना शॉर्ट पिच बॉलचा सामना करणे नेहमीच जड गेले आहे. टीम इंडियाचे बॅटर्स फारसे फॉर्मात नाहीत. त्यावेळी भारतीय टीमची ही दुखरी नस दाबण्यासाठी एल्गार फास्ट बॉलर्सचा वापर करणार आहे. केपटाऊनचा इतिहास देखील आफ्रिकेच्या बाजूने आहे. केपटाऊनमध्ये दोन्ही देशांमध्ये आजवर 5 टेस्ट झाल्या आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 3 जिंकल्या असून उर्वरित 2 ड्रॉ झाल्या आहेत. IND vs SA : केपटाऊनमध्ये दाखल होताच जुन्या आठवणींनी बुमराह भावुक, म्हणाला… 2018 साली दोन्ही देशांमध्ये केपटाऊवर झालेल्या टेस्टमध्ये 40 पैकी 38 विकेट्स फास्ट बॉलर्सनी घेतल्या होत्या. अन्य 2 रन आऊट झाले होते. त्यावरून या पिचचा इतिहास लक्षात येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.