जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : केपटाऊनमध्ये दाखल होताच जुन्या आठवणींनी बुमराह भावुक, म्हणाला...

IND vs SA : केपटाऊनमध्ये दाखल होताच जुन्या आठवणींनी बुमराह भावुक, म्हणाला...

IND vs SA : केपटाऊनमध्ये दाखल होताच जुन्या आठवणींनी बुमराह भावुक, म्हणाला...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट केपटाऊनमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) हे मैदान खास आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट केपटाऊनमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) हे मैदान खास आहे. बुमराहने 4 वर्षांपूर्वी याच मैदानात टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता टीम इंडियाला आफ्रिकेत पहिल्यांदा टेस्ट सीरिज जिंकून देण्याची बुमराहवर मोठी जबाबदारी बुमराहवर आहे. त्यासाठी त्याला केपटाऊन टेस्टमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बुमराह केपटाऊनमध्ये दाखल होताच जुन्या आठवणींनी भावुक झाला. टीम इंडियाने सराव केल्यानंतर त्याने एक ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘केपटाऊन 2018, मी 4 वर्षांपूर्वी इथेच टेस्ट क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. 4 वर्षांमध्ये एक खेळाडू आणि व्यक्ती म्हणून माझा अधिक विकास झाला आहे. या मैदानावर परत येताच जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.’ असे बुमराह म्हणाला.

जाहिरात

बुमराहसाठी जोहान्सबर्ग टेस्ट निराशाजनक ठरली. त्याने त्या टेस्टमध्ये एकूण 38 ओव्हर बॉलिंग केली आणि फक्त 1 विकेट घेतली. बुमराहनं टेस्ट करिअरमधील पहिल्या इनिंगमध्ये एक तर दुसऱ्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. चार वर्षांपूर्वी झालेली ती टेस्ट टीम इंडियाने 72 रनने गमावली होती. भारतीय टीमने केपटाऊनमध्ये आजवर एकही टेस्ट जिंकलेली नाही. पाकिस्तानी मीडियाचा IPL बाबत थयथयाट, दक्षिण आफ्रिका बोर्ड आणि BCCI वर निशाणा भारतीय फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता अंधूक आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या तयारीला धक्का बसला आहे. सिराजला दुसऱ्या टेस्टमध्ये दुखापत झाली होती. त्याच्या जागी इशांत शर्मा किंवा उमेश यादवचा टीममध्ये समावेश होईल. पाठदुखीमुळे दुसरी टेस्ट खेळू न शकलेला कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) केपटाऊनमध्ये खेळणार असून विराटसाठी मिडल ऑर्डरमधील एका बॅटरला बाहेर बसावे लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात