Home /News /sport /

IND vs SA : शार्दुल ठाकूर ठरला टीम इंडियासाठी नायक, पण 'या' खेळाडूसाठी खलनायक

IND vs SA : शार्दुल ठाकूर ठरला टीम इंडियासाठी नायक, पण 'या' खेळाडूसाठी खलनायक

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट रंगतदार अवस्थेत आला आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा हिरो ठरला.

    मुंबई, 5 जानेवारी :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट  रंगतदार अवस्थेत आला आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा हिरो ठरला. अन्य बॉलर्स अपयशी ठरत असताना शार्दुलनं टीम इंडियाच्या बॉलिंगची भिस्त सांभाळली. त्याने मंगळवारी टेस्ट करियरमधली आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शार्दुलने त्याने 61 रन देऊन 7 विकेट घेतल्या. जोहान्सबर्गच्या मैदानातली भारतीय बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आपल्या करियरमधली सहावी टेस्ट खेळणाऱ्या शार्दुलने पहिल्यांदाच 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी 61 रनमध्ये 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 202 रन केले होते, पण शार्दुलच्या शानदार बॉलिंगमुळे दक्षिण आफ्रिकेचा 229 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे त्यांना फक्त 27 रनचीच आघाडी घेता आली. शार्दुल ठाकूर या कामगिरीमुळे टीम इंडियाचा नायक ठरला. पण एका ऑलराऊंडरसाठी मात्र खलनायक ठरला आहे. या ऑल राऊंडरचं नावं आहे हार्दिक पांड्या (Hardik Pandya). हार्दिक पांड्या गेल्या काही वर्षांपासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याने दुखापतीमुळे सर्वप्रथम टेस्ट टीममधील जागा गमावली.  2020 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियातील टेस्ट टीममध्ये त्याचा समावेश झाला नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीमध्येच शार्दुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या दौऱ्यातील शेवटच्या टेस्टमध्ये त्याने अर्धशतक झळकावले. त्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही शार्दुलनं चांगली कामगिरी केली. या सीरिजमधील टीम इंडियाच्या विजयाचा तो शिल्पकार होता. शार्दुलनं हा फॉर्म दक्षिण आफ्रिकेत देखील कायम ठेवला आहे. डिअर रेड बॉल, मला एक संधी दे! टीम इंडियाचा खेळाडू झाला भावुक इकडे शार्दुल तिकडे अय्यर हार्दिक पांड्याच्या करिअरमधील बॅड पॅच सध्या सुरू आहे. त्याला आगामी आयपीएल सिझनपूर्वी मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians ) रिटेन केले नाही. टेस्ट टीममध्ये शार्दुलने त्याची जागा घेतली आहे. तर लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये व्यंकटेश अय्यर या तरूण खेळाडूवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. व्यंकटेश अय्यरनं विजय हजारे स्पर्धेत बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये कमाल केली आहे. त्याने 6 इनिंगमध्ये 63 च्या सरासरीनं 379 रन काढले. यामध्ये 2 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 9 विकेट्स देखील घेतल्या आहेत. अय्यरला यापूर्वी न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत संधी देण्यात आली होती. अय्यरनं त्याच्या लिस्ट A करियरमधील 28 इनिंगमध्ये 51 च्या सरासरीनं 1228 रन केले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 19 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Hardik pandya, Shardul Thakur, Team india

    पुढील बातम्या