मुंबई, 6 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात जोहान्सबर्गमध्ये सध्या दुसरी टेस्ट मॅच सुरू आहे. या टेस्टमधील दमदार कामगिरीमुळे शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) सध्या चर्चेत आहे. शार्दुलनं आफ्रिकेच्या पहिल्या इनिंगमध्ये 7 विकेट्स घेतल्या. तसंच तिसऱ्या दिवशी 24 बॉलमध्ये 28 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. या कामगिरीमुळे सोशल मीडियावर लॉर्ड शार्दुल ठाकूर (Lord Shardul Thakur) हे नाव ट्रेंडिंग आहे. शार्दुलला लॉर्ड हे नाव कसं मिळालं? हे अनेकांना माहिती नाही. टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी याबाबतचा प्रश्न शार्दुललाच विचारला. त्यावेळी शार्दुलनं याचे उत्तर दिले. ‘मला हे नाव कुणी दिले हे सांगता येणार नाही. पण, मागील वर्षी इंग्लंड विरुद्ध भारतामध्ये झालेल्या सीरिजनंतर ‘लॉर्ड’ नाव ट्रेंड होऊ लागले. आयपीएलपूर्वी झालेल्या त्या सीरिजमध्ये मला चांगल्या विकेट्स मिळाल्या. विशेषत: मी एका ओव्हर्समध्ये सातत्याने 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर हे नाव मिळाले.’ असे शार्दुलने स्पष्ट केले. शार्दुलनं यावेळी त्याच्या यशाचे रहस्य देखील सांगितले. ‘मी मैदानात नेहमीच आत्मविश्वासानं पाऊल ठेवतो. हा माझ्या यशाचा साधा आणि छोटा मंत्र आहे. मी हे यापुढेही कायम ठेवणार करणार आहे. मी योग्य ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होतो. मला पिचने देखील मदत केली. देवाच्या कृपेने मला सात विकेट्स मिळाल्या. टीमसाठी योगदान दिल्यानं मी आनंदी आहे,’ असे शार्दुलने सांगितले.
Man of the moment @imShard reacts to the social media frenzy post his 7⃣-wicket haul at The Wanderers. 👏 👍
— BCCI (@BCCI) January 5, 2022
P.S. How did he get the title of 'Lord'? 🤔 #TeamIndia #SAvIND
To find out, watch the full interview by @28anand 🎥 🔽 https://t.co/dkWcqAL3z5 pic.twitter.com/vSIjk2hvyR
शार्दुलने मंगळवारी टेस्ट करियरमधली आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शार्दुलने त्याने 61 रन देऊन 7 विकेट घेतल्या. जोहान्सबर्गच्या मैदानातली भारतीय बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. नंबर 1 टेनिसपटू जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाकडून रद्द, देशातून करणार हकालपट्टी आपल्या करियरमधली सहावी टेस्ट खेळणाऱ्या शार्दुलने पहिल्यांदाच 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी 61 रनमध्ये 4 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 202 रन केले होते, पण शार्दुलच्या शानदार बॉलिंगमुळे दक्षिण आफ्रिकेची टीम पहिल्या इनिंगमध्ये 229 रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे त्यांना फक्त 27 रनचीच आघाडी घेता आली.