Home /News /sport /

मोठी बातमी! नंबर 1 टेनिसपटू जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाकडून रद्द, देशातून करणार हकालपट्टी

मोठी बातमी! नंबर 1 टेनिसपटू जोकोविचचा व्हिसा ऑस्ट्रेलियाकडून रद्द, देशातून करणार हकालपट्टी

ऑस्ट्रेलियाने नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) व्हिसा रद्द केला आहे. जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत (Australian Open Tennis 2022) भाग घेण्यासाठी मेलबर्नमध्ये दाखल झाला होता.

    मेलबर्न, 6 जानेवारी : ऑस्ट्रेलियाने नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) व्हिसा रद्द केला आहे. जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत (Australian Open Tennis 2022) भाग घेण्यासाठी मेलबर्नमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी त्याला मेलबर्न विमानतळावरच रोखण्यात आले. ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासंदर्भातील योग्य कागदपत्रं दाखवण्यात अपयश आल्याने त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. जोकोविचला ऑस्ट्रेलियातून बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने (APF) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि पुरावे जोकोविचला सादर करता आले नाहीत. त्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.या विषयावर कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन (Scoot Morrison) यांनी दिली आहे. काय आहे प्रकरण? नोवाक जोकोविचनं मेडिकल कारण देत लसीकरणाचे स्टेटस ( Vaccination status) सांगण्यास नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 9 वेळा जिंकणाऱ्या जोकोविचनं मेडिकल कारण देत व्हिसा नियमांमध्ये सूट देण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली होती. एक दिवसापूर्वी त्याची ही मागणी मान्य झाल्याचा दावा त्याने केला होता. जोकोविच मेलबर्नमध्ये दाखल होताच त्याला विमानतळावरच थांबवण्यात आले. त्याने चुकीच्या प्रकारात अर्ज केल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन मीडियानं दिले आहे. या सर्व प्रकाराला जोकोविच कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 17 जानेवारीपासून  सुरू होणार आहे. 37 वर्षांच्या बॉलरचं T20 मध्ये वादळ, 13 बॉलमध्ये घेतल्या 5 विकेट्स सर्बियाच्या अध्यक्षांचा हस्तक्षेप सर्बियाचे अध्यक्ष अ‍ॅलेक्सझँडर वूसीक यांनी जोकोविचची फोनवर चर्चा केली आहे. 'संपूर्ण सर्बिया जोकोविचच्या पाठिशी आहे. त्याच्यावरील अन्याय लवकारत लवकर दूर व्हावा यासाठी आमचे प्रशासन प्रयत्न करत आहे. सर्बिया आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जोकोविचची लढाई लढणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Corona vaccination, Tennis player

    पुढील बातम्या