मुंबई, 12 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात बरेच बदल झाले आहेत. वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून विराट कोहलीला (Virat Kohli) हटवण्यात आले असून आता रोहित शर्मा (Rohit Sharma) या टीमचा कॅप्टन असेल. त्याचबरोबर टेस्ट टीमच्या व्हाईस कॅप्टनपदी देखील रोहितची नियुक्ती करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) खराब फॉर्ममुळे हे पद गमावावे लागले आहे. या सर्व बदलानंतर आज (रविवारी) पहिल्यांदाच विराट आणि रोहित आमने-सामने येणार आहेत. टीम इंडिया रविवारी संध्याकाळी मुंबईत एकत्र येणार आहे. त्यानंतर पुढील 3 दिवस सर्व सदस्य मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन असतील. 16 डिसेंबर रोजी सर्व जण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होतील. आफ्रिकेतही सुरूवातीला काही दिवस टीम इंडिया क्वारंटाईन असेल तसेच सर्व खेळाडू बायो-बबलमध्येच सराव करणार आहे. दोन्ही देशांच्या टेस्ट सीरिजला 26 डिसेंबर रोजी सुरूवात होणार आहे. विराट कोहली टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. टीम इंडियाला अद्याप एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. या दौऱ्यातील दुसरी टेस्ट 3 जानेवारीपासून तर तिसरी 11 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. विराट कोहली याच दौऱ्यात 100 टेस्ट खेळण्याचा रेकॉर्ड करेल. त्याने आजवर 97 टेस्ट खेळल्या असून त्यामध्ये 27 शतक झळकावली आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्त्वामध्ये टीम इंडियाने नुकताीच न्यूझीलंड विरुद्धची टेस्ट सीरिज 1-0 ने जिंकली आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. त्यानंतर मुंबईत झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये भारतीय टीमने न्यूझीलंडचा 372 रनने पराभव केला. Olympic मध्ये क्रिकेटच्या समावेशाला मोठा धक्का, आता एकाच गोष्टीवर आशा कायम दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीम विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा ( व्हाईस कॅप्टन), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज. स्टँडबाय खेळाडू : नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागासवाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







