मुंबई, 13 जून : टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) सध्या ब्रेकवर आहे. आयपीएल स्पर्धेनंतर सुट्टी मिळालेला विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) सुट्टीचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्कानं या दोघांचा समुद्र किनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता विराटनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. विराट कोहलीनं बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) स्टाईलनं शर्टलेस फोटो शेअर केलाय. त्या फोटोमध्ये तो समुद्र किनाऱ्यावर बसलेला असून त्याच्या बॉडीवरील टॅटू देखील दिसत आहेत. टीम इंडियातील सर्वात फिट खेळाडू असलेल्या विराटचा हा शर्टलेस फोटो चांगलाच व्हायरल झालाय.
विराट कोहलीला आयपीएल 2022 नंतर 20 दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. यानंतर तो जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये टेस्ट आणि लिमिटेड ओव्हरची सीरिज खेळताना दिसेल. टीम इंडिया 15 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. कोहलीसह कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडिया एक टेस्ट, तीन वन-डे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. या मालिकेत विराटला फॉर्म गवसेल अशी आशा त्याच्या फॅन्सना आहे. IND vs SA : रोहित शर्मा नसेल तर टीम इंडियाचा पराभव नक्की, आकडेवारी आहे पुरावा विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा चकदा एक्सप्रेस या चित्रपटात दिसणार आहे, पण त्याआधी तिनेही छोटासा ब्रेक घेतला आहे. या चित्रपटात अनुष्का भारतीय महिला क्रिकेट टीमची अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे