मुंबई, 17 डिसेंबर : टीम इंडिया गुरूवारी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली आहे. दोन्ही देशांमधील (India vs South Africa) पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला दिलासा मिळला आहे. दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर-बॅटर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) वैयक्तिक कारणामुळे संपूर्ण सीरिज खेळणार नाही. तो 26 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्टसाठी उपलब्ध असेल, पण नंतरच्या दोन टेस्टमधून माघार घेणार आहे. डी कॉकची पत्नी साशा हार्ली सध्या गर्भवती आहे. त्यांना जानेवारी महिन्यात बाळ होणार आहे. त्यामुळे तो शेवटच्या दोन टेस्ट खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये काइल वेरेन खेळण्याची शक्यता असल्याचं वृत्त इनसाईड स्पोर्ट्सनं दिलं आहे. दोन टेस्टच्या ब्रेकनंतर 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे सीरिजसाठी डी कॉक उपलब्ध असेल. क्विंटन डी कॉकनं माघार घेतल्यानं टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, तो दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख बॅटर आहे. त्याने टेस्ट कारकिर्दीमध्ये 53 मॅचमध्ये 39.09 च्या सरासरीनं 3425 रन बनवले आहेत. यामध्ये 6 शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेत आजवर 20 टेस्ट मॅच खेळल्या असून त्यापैकी फक्त 3 जिंकल्या आहेत. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत आजवर एकदाही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. 2018 साली आफ्रिकेत झालेली टेस्ट सीरिज भारतीय टीमनं 1-2 अशा फरकानं गमावली होती. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात आजवर तीनच टीमनी (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका) दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकली आहे. सानिया मिर्झा नवऱ्यासाठी जेवण का बनवत नाही? शोएब मलिकनं केला खुलासा टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा कडक प्रोटोकॉल पाळण्याची गरज नाही. भारतीय टीमला फक्त 1 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल. त्या दिवसभरात खेळाडूंच्या तीन टेस्ट होतील. या सर्व टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर खेळाडूंना आयसोलेशनच्या बाहेर येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे