मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सानिया मिर्झा नवऱ्यासाठी जेवण का बनवत नाही? शोएब मलिकनं केला खुलासा

सानिया मिर्झा नवऱ्यासाठी जेवण का बनवत नाही? शोएब मलिकनं केला खुलासा

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकनं (Shoaib Malik) त्याची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) त्याच्यासाठी जेवण  का तयार करत नाही याचा खुलासा केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 डिसेंबर : शोएब मलिक (Shoaib Malik) आणि वहाब रियाझ (Wahab Riyaz) हे पाकिस्तानी क्रिकेटपटू सध्या लंका प्रीमियर लीग (LPL) मधील  जाफना किंग्स टीमकडून खेळत आहेत. त्यांनी या स्पर्धेच्या दरम्यान दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये एकमेकांबद्दलच्या अनेक मजेशीर प्रश्नांना उत्तरं दिली. या मुलाखतीमध्ये शोएबनं त्याची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) त्याच्यासाठी जेवण  का तयार करत नाही याचा खुलासा केला आहे.

या मुलाखतीमध्ये जेवणाबद्दल जास्त उतावीळ कोण आहे? असा प्रश्न दोघांनाही विचारण्यात आला होता. त्यावेळी शोएब म्हणाला की, 'हा प्रश्न माझ्या बायकोला (सानिया मिर्झा) विचारा. ती तुम्हाला सविस्तर उत्तर देईल. मी जेवणाच्या बाबतीत कायम गोंधळलेला असतो, त्यामुळे ती माझ्यासाठी जेवण बनवत नाही. नेहमी बाहेरून ऑर्डर करते.' दोन खेळाडूंमध्ये अधिक आळशी कोण आहे हा प्रश्न विचारल्यावर शोएबनं वहाब रियाझकडे बोट दाखवलं. वहाब फास्ट बॉलर आहे. त्यामुळे खेळताना खूप ऊर्जा खर्च होते. त्यामुळे तो मैदानाच्या बाहेर आळशी आहे.' असे, शोएबने सांगितले.

या दोघांमध्ये खाण्याची आवड कुणाला जास्त आहे ? या प्रश्नावर वहाबने शोएब मलिकचं नाव घेतलं. पहाटे तीन वाजता देखील त्याच्या खोलीत क्लब सँडविच असेल असे वहाब म्हणाला. त्यावर मी दिवसातून 6 वेळा जेवण करतो. पण प्रत्येक वेळी मी मोजकंच खातो असे शोएबने सांगितले. वहाबने यावेळी कराचीत एकत्र पार्टी करण्याची त्यांची योजना यशस्वी का झाली नाही, याची माहिती दिली.

Ashes Series: डेव्हिड वॉर्नर मैदानाबाहेरही सुपरहिट, फॅन्सचं जिंकलं मन! पाहा VIDEO

'आपण कराचीमध्ये एकत्र राहून खूप मजा करू असे शोएबने मला सांगितले होते. पण त्याची टी20 वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली.त्यामुळे आम्ही बनवलेला एकही प्लॅन पूर्ण झाला नाही,' असे वहाब यावेळी म्हणाला. दरम्यान जाफना किंग्सनं सोमवारी झालेल्या मॅचमध्ये दांबुला जायंट्सचा पराभव करत लंका प्रीमियर लीगच्या 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे.

First published:

Tags: Cricket news, Pakistan, Sania mirza