Home /News /sport /

IND vs SA: टीम इंडियात नव्या खेळाडूंची एन्ट्री, 57 शतक करणाऱ्या दिग्गजाची जागा धोक्यात

IND vs SA: टीम इंडियात नव्या खेळाडूंची एन्ट्री, 57 शतक करणाऱ्या दिग्गजाची जागा धोक्यात

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात होणाऱ्या वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे.

    मुंबई, 1 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात होणाऱ्या वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी पूर्णवेळ कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) अद्याप फिट नाही. त्यामुळे केएल राहुल (KL Rahul) टीमचा कॅप्टन असेल. निवड समितीनं या दौऱ्यासाठी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांचा टीममध्ये समावेश केला आहे. त्यांच्या निवडीमुळे टीम इंडियातील दिग्गजाची जागा धोक्यात आली आहे. ऋतुराजनं विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक 603 रन काढले आहे. त्याने 5 इनिंगमध्ये 4 शतक झळकावले. त्याची स्पर्धेतील सरासरी 151 होती. त्यापूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021)  त्याने सर्वाधिक रन केले होते. ऋतुराजनं लिस्ट ए क्रिकेटमध्ये 63 मॅचमध्ये 3284 रन काढले आहेत. यामध्ये 11 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये तो राहुलसोबत ओपनिंगला खेळू शकतो. अय्यरची ऑल राऊंड कामगिरी व्यंकटेश अय्यरनं विजय हजारे स्पर्धेत बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये कमाल केली आहे. त्याने 6 इनिंगमध्ये 63 च्या सरासरीनं 379 रन काढले. यामध्ये 2 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 9 विकेट्स देखील घेतल्या आहेत. अय्यरला यापूर्वी न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत संधी देण्यात आली होती. अय्यरनं त्याच्या लिस्ट A करियरमधील 28 इनिंगमध्ये 51 च्या सरासरीनं 1228 रन केले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 19 विकेट्स देखील घेतल्या आहेत. विराट कोहली खोटं बोलला? गांगुलीनंतर निवड समितीनंही फेटाळला 'तो' दावा दिग्गज खेळाडू अडचणीत ऋतुराज आणि व्यंकटेश अय्यरच्या निवडीमुळे टीम इंडियाचा अनुभवी ओपनर शिखर धवनची (Shikhar Dhawan) जागा धोक्यात आली आहे. धवनची वन-डे टीममधील जागा कायम आहे. पण, तो प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकूण 57 शतक झळकावणारा धवन विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप ठरला होता. त्याने 5 मॅचमध्ये फक्त 56 रन केले होते.  भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे मालिकेतील सामने 19, 21 आणि 23 जानेवारी रोजी होणार आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Shikhar dhawan, South africa, Team india

    पुढील बातम्या