जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियानं गाळला घाम, आफ्रिकेत घडणार इतिहास!

IND vs SA : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियानं गाळला घाम, आफ्रिकेत घडणार इतिहास!

IND vs SA : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियानं गाळला घाम, आफ्रिकेत घडणार इतिहास!

टीम इंडियानं जोहान्सबर्गमध्ये आजवर एकही टेस्ट (India vs South Africa) गमावेलेली नाही. ही मोठी दिलासादायक बाब आहे. तरीही हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) कोणतीही गोष्ट गृहित धरण्यास तयार नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जानेवारी : टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अपेक्षित सुरूवात केली आहे. सेंच्युरियन टेस्टमध्ये आजवरची परंपरा मोडत भारतीय टीमनं आफ्रिकेचा पराभव केला. आता या मालिकेतील (India vs South Africa) दुसरी टेस्ट सोमवारपासून जोहान्सबर्गमध्ये होणार आहे. या मैदानात टीम इंडियानं आजवर एकही टेस्ट गमावलेली नाही. ही मोठी दिलासादायक बाब आहे. तरीही हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) कोणतीही गोष्ट गृहित धरण्यास तयार नाहीत. भारतीय टीमनं शनिवारी म्हणजेच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सेलिब्रेशन करण्याऐवजी वाँडर्सच्या मैदानावर चांगलाच घाम गाळला. या टेस्टमध्ये सर्वांचे लक्ष हे विराट कोहलीवर (Virat Kohli) असेल. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं आहे. त्यानंतर विराट गेल्या 2 वर्षात 60 आंतरराष्ट्रीय इनिंग खेळला, पण त्याला शंभरीचा टप्पा पार करता आलेला नाही. वाँडर्सच्या मैदानात विराटचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने या स्टेडियमवर एका सेंच्युरीसह 300 पेक्षा जास्त रन केले आहेत. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारताने इथं 2018 साली एक टेस्ट मॅच देखील जिंकली  होती. पहिल्या टेस्टमध्ये विराटनं 35 आणि 18 रन काढले होते. आता दुसऱ्या टेस्टमध्ये त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे राहुल द्रविडनं विराटसोबत नेटमध्ये बराच वेळ घालवला आणि त्याला टिप्स दिल्या. विराट प्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) देखील सध्या फॉर्मात नाही. तो सेंच्युरियन टेस्टमध्ये फ्लॉप ठरला होता. त्यानंतरही द्रविडचा त्याच्यावर विश्वास कायम आहे. द्रविड पुजारासोबतही त्याच्या बॅटींगवर काम करत आहे. त्याचबरोबर द्रविडने केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनाही सरावाच्या दरम्यान मार्गदर्शन केले. हरभजन सिंग पंजाब विधानसभा निवडणूक लढणार? राजकारणातील प्रवेशाबाबत भज्जीनं सोडलं मौन टीम इंडियात दोन बदल? भारताने दक्षिण आफ्रिकेत आजवर एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विजय मिळवून 29 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी टीम इंडियाला आहे.  जोहान्सबर्गची खेळपट्टी पाहता टीममध्ये दोन बदल होऊ शकतात. शार्दुल ठाकूरऐवजी (Shardul Thakur) फास्ट बॉलर उमेश यादवचं (Umesh Yadav) टीममध्ये पुनरागमन होऊ शकतं, तर अश्विनऐवजी (R Ashwin) अतिरिक्त बॅटर मैदानात उतरण्याची शक्यता आहे. टीमने असा निर्णय घेतला तर हनुमा विहारीला (Hanuma Vihari) संधी मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात