मुंबई, 2 जानेवारी : टीम इंडियाचा दिग्गज बॉलर हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हरभजन दुसरी इनिंग राजकीय मैदानात सुरू करेल. पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly Election) यावर्षी होणार आहेत. हरभजन काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. भज्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये राजकीय प्रवेशाच्या चर्चेवर मौन सोडले आहे. ‘मी निवडणूक लढवणार नाही. राजकारणात येणार की नाही हे अद्याप ठरलेलं नाही. क्रिकेटमध्ये पुढे काय मोठं काम करता येईल हे मला ठरवायचं आहे. लोकांसाठी काम करण्याचा मार्ग शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकांनी मला खूप प्रेम दिलं आहे. त्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला. त्यांच्या आयुष्यात काही बदल करता आला तर मला आनंद होईल.’ असे हरभजनने झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. राजकारणातील प्रवेशाबाबत हरभजन पुढे म्हणाला की, ‘माझ्या निवृत्तीचे पंजाब निवडणुकीशी कोणतेही कनेक्शन नाही. मी राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण, सध्या तसं होणार नाही. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्व पक्षांना मी शुभेच्छा देतो. या विषयावर कोणताही निर्णय झाला तर मी त्याची माहिती फॅन्सना देईन. नव्या कोचच्या निवडीबाबत बाबर आझम आणि PCB मध्ये मतभेद! प्रत्येक क्रिकेटपटूची मैदानात निवृत्त होण्याची इच्छा असते. पण, हे भाग्य सर्वांना मिळत नाही. वीरेंद्र सेहवाग आणि लक्ष्मण सोबत देखील हे घडलं नाही. बीासीसीआयनं त्यांना निवृत्त होण्यापूर्वी एक मॅच दिली असती तर त्यांची इच्छा पूर्ण झाली असती. हे भारतीय क्रिकेटमधील दिग्गज आहेत. त्यांनी 10-15 वर्ष क्रिकेटसाठी दिले. या प्रकारामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी झाली नाही. पण, याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही.’ असे हरभजनने एका अन्य उत्तरात स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.