मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पुन्हा मौका-मौका! World Cup 2022 मध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, पाहा संपूर्ण वेळापत्रक

पुन्हा मौका-मौका! World Cup 2022 मध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील प्रत्येक क्रिकेट मॅचची फॅन्सना मोठी उत्सुकता असते. World Cup 2022 मध्ये या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

मुंबई, 15 डिसेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील प्रत्येक क्रिकेट मॅचची फॅन्सना मोठी उत्सुकता असते. त्यात वर्ल्ड कप स्पर्धेतील मॅच असेल तर ही मॅच नेहमीच जगभरात मोठ्या संख्येने पाहिली जाते. आयसीसीनं पुढील वर्षी होणाऱ्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपचं (ICC Women Cricket World Cup 2022) स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये या दोन टीम एकमेकांच्या समोर येणार आहेत.

महिला क्रिकेट वर्ल्डकपला 4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरूवात होणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यानं या स्पर्धेची सुरूवात करेल. दोन्ही देशांमधील ही लढत 6 मार्च रोजी हेमिल्टनमध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 31 सामने होणार असून 31 दिवस ही स्पर्धा चालेल.

या स्पर्धेत 8 टीम उतरणार आहेत.ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत या टीमने या स्पर्धेत त्यांच्या कामगिरीच्या जोरावर थेट प्रवेश केला. तर न्यूझीलंडची टीम यजमान असल्यानं आपोआप पात्र झाली.  नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारतीय पुरूष टीमची (Indian's menes cricket team) पहिली मॅच पाकिस्तान विरुद्धच होती.

क्रिकेटच्या मैदानात मोठा अपघात, स्टेडियमधील प्रेक्षक बॉल लागल्यानं जखमी! VIDEO

महिला क्रिकेट वर्ल्ड कप यंदा लीग फॉर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. यानुसार सर्व 8 टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळतील. लीगमध्ये टॉप 4 ठरलेल्या टीम सेमी फायनलसाठी पात्र होतील. वर्ल्ड कपमधील पहिली सेमी फायनल 30 मार्च रोजी वेलिंग्टनमध्ये होईल. तर 31 मार्च रोजी दुसरी सेमी फायनल हेग्ले ओव्हलमध्ये होणार आहे. 3 एप्रिल रोजी फायनल लढत होईल. दोन्ही सेमी फायनल आणि फायनलसाठी एक दिवस अतिरिक्त राखून ठेवण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs Pakistan