जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'टीम इंडियाची 2 गटामध्ये विभागणी, विराट आणि राहुल ड्रेसिंग रूममध्ये वेगळे बसले,' नव्या दाव्यानं खळबळ

'टीम इंडियाची 2 गटामध्ये विभागणी, विराट आणि राहुल ड्रेसिंग रूममध्ये वेगळे बसले,' नव्या दाव्यानं खळबळ

'टीम इंडियाची 2 गटामध्ये विभागणी, विराट आणि राहुल ड्रेसिंग रूममध्ये वेगळे बसले,' नव्या दाव्यानं खळबळ

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या वन-डेमध्ये टीम इंडियाचा 31 रनने पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियात मतभेद असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या वन-डेमध्ये टीम इंडियाचा 31 रनने पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळातील कमतरता पुन्हा एकदा उघड झाली. भारतीय टीमला आता वन-डे मालिका जिंकायची असेल तर उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागतील. दोन्ही टीममधील दुसरी लढत आज (शुक्रवार) आहे. भारतीय टीम दुसऱ्या लढतीची तयारी करत असतानाच पाकिस्तानचा माजी बॉलर दानिश कानेरियानं (Danish Kaneria) एक वादग्रस्त दावा केला आहे. भारतीय टीम सध्या दोन गटामध्ये विभागली गेल्याचा दावा कानेरियानं त्याच्या युट्यूब चॅनेलवरून केला आहे. पहिल्या मॅच दरम्यान ही परिस्थिती जाणवल्याचं कानेरियाने म्हंटले आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे वेगळं बसले होते. त्याचबरोबर कोहलीमध्ये तो कॅप्टन असतानाचा जोश दिसत नव्हता. पण, तो मेन खेळाडू असून पुनरागमन करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. राहुल हा लिमिटेड ओव्हर्सच्या टीमचा व्हाईस कॅप्टन आहे. पण, नियमित कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे अनुपस्थित असल्याने राहुल कॅप्टनसी करत आहे. तर विराट कोहलीला डिसेंबर महिन्यात वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्यात आले होते. पहिल्या वन-डेमध्ये विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकामुळे  टीम इंडियाचा स्कोअर एकवेळेस 1 आऊट 138 होता. हे दोघे आऊट झाल्यानंतर मिडल ऑर्डरनं निराशा केली.  पुढच्या 50 रनमध्ये टीम इंडियाने  5 विकेट्स गमावल्या. शार्दुल ठाकूरनं एकाकी प्रतिकार करत अर्धशतक झळकावलं. पण, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. स्टीव्ह स्मिथला धक्का, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळली मोठी मागणी! केएल राहुलची कॅप्टन म्हणून ही पहिलीच वनडे होती, पण आपल्या पहिल्याच वनडेमध्ये राहुलच्या पदरी निराशा आली. याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातच जोहान्सबर्ग टेस्टमध्ये विराटला दुखापत झाल्यामुळे राहुलला टेस्ट टीमची पहिल्यांदाच कॅप्टन्सी मिळाली, त्या टेस्टमध्येही भारताला पराभव पत्करावा लागला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात