मुंबई, 13 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये फास्ट बॉलर्सचा दबदबा आहे. दोन्ही टीमच्या बॉलर्सनी ही सीरिज गाजवली आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक नो बॉल देखील टाकले आहेत. या सीरिजमधील दोन्ही टीमचा खेळ पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेननं (Dale Steyn) टेस्ट क्रिकेटमध्येही फ्री हिट (Free hit in Test Cricket) देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये नो बॉलनंतर पुढच्या बॉलवर फ्री हिट देण्यात येते. यामध्ये तो बॅटर कॅच आऊट किंवा बोल्ड होत नाही. टेस्ट क्रिकेटमध्येही ही पद्धत सुरू करावी अशी मागणी स्टेननं केली आहे. याचे त्याने खास कारण देखील दिले आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये ही पद्धत सुरू झाल्यास लोअर ऑर्डरमधील बॅटरचा फायदा होईल. कसा होईल फायदा? भारत-आफ्रिका सीरिजमध्ये फास्ट बॉलर्स लोअर ऑर्डरच्या बॅटर्सना लक्ष्य करत शॉर्ट बॉलचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकदा ओव्हर 8-9 बॉलपर्यंत लांबतात. ते पाहून स्टेननं हा प्रस्ताव दिला आहे. ‘टेस्ट क्रिकेटमध्ये ‘नो बॉल’ टाकल्यावर फ्री हिट… तुम्हाला काय वाटते? यामुळे बॉलर्सचा बॅटींग करताना फायदा होणार आहे. 7-8 बॉल कधी-कधी 9 बॉलच्या ओव्हर्सचा सामना करण्यापासून त्यांची सुटका होईल. लोअर ऑर्डर्सच्या बॅटरसाठी प्रमुख फास्ट बॉलर्सच्या 6 बॉलचा सामना करणे देखील खूप आहे.’ असे ट्विट स्टेनने केले आहे.
Free hit for No Ball in Test Cricket…
— Dale Steyn (@DaleSteyn62) January 12, 2022
What you think?
Will definitely help the bowlers (when batting) survive those extended 7/8 and sometimes 9 ball overs we’ve seen happen before…
6 balls is Hard enough for the tailenders facing a top class life threatening fast bowler.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टेस्टमध्ये आत्तापर्यंत फक्त 2 दिवसाचा खेळ झाला आहे. या दोन दिवसात 16 नो बॉल टाकण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडानेच यापैकी 10 नो बॉल टाकले आहेत. रबाडाने दुसऱ्या इनिंगमध्ये आत्तापर्यंत फक्त 6 ओव्हर बॉलिंग केलीय. त्यात त्याने 5 नो बॉल टाकले आहेत. IND vs SA : मुंबईच्या कोचला टीम इंडियाच्या विजयाची खात्री, माजी क्रिकेटपटूनं करून दिली आठवण