मुंबई, 13 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील तिसरी टेस्ट सध्या रंगतदार अवस्थेत आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 13 रनची निसटती आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 2 आऊट 57 इतका होता. विराट कोहली (Virat Kohli) 14 रनवर तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 रनवर खेळत आहेत. टीम इंडियाकडे सध्या 70 रनची आघाडी आहे. तसंच आणखी 8 विकेट्स शिल्लक आहेत. सेंच्युरियनमधल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केलं, यानंतर सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता केपटाऊनची टेस्ट निर्णायक ठरणार आहे. भारताला अजूनपर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही, त्यामुळे केपटाऊन टेस्ट जिंकून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. टीम इंडिया केपटाऊन टेस्ट जिंकणार असा विश्वास मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कोचिंग स्टाफमधील सदस्य आणि माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने (Parthiv Patel) व्यक्त केला आहे. पार्थिवनं यावेळी एका खास आकडेवारीचा आधार दिला आहे. जयप्रीत बुमराहानं 5 विकेट्स घेतल्यानंतर आजवर भारतीय टीमनं कधीही टेस्ट गमावलेली नाही. ही परंपरा केपटाऊनमध्येही कायम राहील, असा पार्थिवला विश्वास आहे.
Don’t want to jinx it but India had never lost a Test when Pujara-Rahane had a 100-run partnership too…till the last Test match at Johannesburg 🙈 https://t.co/9iAJ2bBfcl
— Aakash Chopra (@cricketaakash) January 12, 2022
पार्थिव पटेलनं केलेल्या याबाबतच्या ट्विटला माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने उत्तर दिलं आहे. मला जिंक्स करायचे नाही, पण जोहान्सबर्ग टेस्टपूर्वी रहाणे आणि पुजाराने 100 रनची पार्टनरशिप केल्यानंतर टीम इंडियाने एकदाही टेस्ट मॅच हरलेली नव्हती, अशी आठवण आकाशने करून दिली आहे. IPL 2022 : आयपीएलच्या 10 टीम करणार 33 खेळाडू रिटेन! ‘या’ तारखेला जाहीर होणार संपूर्ण यादी जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) धमाकेदार कामगिरीमुळे भारताने पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतली. दिवसाच्या दुसऱ्याच बॉलला बुमराहने एडन मार्करमला बोल्ड केलं. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 42 रन देऊन 5 विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूरला 1 विकेट घेण्यात यश आलं.