मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SA : टीम इंडियातील पुणेकर ठरला सोशल मीडियावर व्हिलन, ग्राऊंड्समनबरोबरचा Video Viral

IND vs SA : टीम इंडियातील पुणेकर ठरला सोशल मीडियावर व्हिलन, ग्राऊंड्समनबरोबरचा Video Viral

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळीच्या प्रतिक्षेत असलेला टीम इंडियातील (Team India) पुणेकर वादात सापडला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळीच्या प्रतिक्षेत असलेला टीम इंडियातील (Team India) पुणेकर वादात सापडला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळीच्या प्रतिक्षेत असलेला टीम इंडियातील (Team India) पुणेकर वादात सापडला आहे.

मुंबई, 20 जून : टीम इंडियाचा ओपनर ऋतुराज गायकवाडची  (Ruturaj Gaikwad) बॅट भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA T20) टी20 मालिकेत शांत होती. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या खेळीच्या प्रतिक्षेत असलेला ऋतुराज वादात सापडला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो ग्राऊंड्समनला धक्का देत असल्याचं दिसत आहे.

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात बेंगळुरूमध्ये झालेल्या शेवटच्या टी20 सामन्यातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पाच सामन्यांची ही मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. व्हायरल व्हिडीओमध्ये ऋतुराज हेल्मेट, पॅड आणि ग्लोज घालून डग आऊटमध्ये बसलाय. त्यावेळी एक ग्राऊंड्समन त्याच्या जवळ बसून सेल्फी घेऊ लागतो. त्यावेळी ऋतुराजनं त्याला हलका धक्का दिला आणि त्याला दूर होण्यास सांगितलं. ऋतुराजची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर फॅन्सनी त्याच्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेत ऋतुराजनं 5 सामन्यात 96 रन केले. या मालिकेत त्याची सरासरी 19.20 होती. तर 57 हा त्याचा सर्वोच्च स्कोर होता. संपूर्ण मालिकेत गायकवाडनं 9 फोर आणि 5 सिक्स लगावले. पावसाच्या अडथळ्यामुळे रद्द झालेल्या बेंगळुरू टी20 मध्ये ऋतुराज 10 रन काढून आऊट झाला. टीम इंडियानं पहिले दोन सामने गमावल्यानंतर विशाखापट्टणम आणि राजकोटमधील टी20 सामने जिंकत जोरदार पुनरागमन केलं होतं.

वर्ल्ड कप विजेता खेळाडू रस्त्यावर वाटतोय चहा, अडचणीत सापडलेल्या देशाचा बनला हिरो

स्वप्न अपूर्ण

टीम इंडियाचं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्धची टी20 मालिका जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण ठरलं. भारताला आजवर कधीही दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानातील टी20 मालिकेत पराभूत करता आलेलं नाही. यंदा देखील ही संधी हातामधून निसटली.

First published:

Tags: Cricket news, South africa, Team india, Video viral