Home /News /sport /

वर्ल्ड कप विजेता खेळाडू रस्त्यावर वाटतोय चहा, अडचणीत सापडलेल्या देशाचा बनला हिरो

वर्ल्ड कप विजेता खेळाडू रस्त्यावर वाटतोय चहा, अडचणीत सापडलेल्या देशाचा बनला हिरो

भारताचा शेजारी असलेला श्रीलंका (Sri Lanka) देश सध्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून (Sri Lanka Economic crisis) जात आहे.

    मुंबई, 20 जून : भारताचा शेजारी असलेला श्रीलंका (Sri Lanka) देश सध्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून (Sri Lanka Economic crisis) जात आहे. अन्न, औषधं आणि इंधन या सगळ्या गोष्टींचा मोठा तुटवडा (Sri Lanka Fuel crisis) सध्या श्रीलंकेत जाणवत आहे. यामुळे या वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. परकीय चलनाचा तुटवडा असल्यामुळे परदेशातून या वस्तू आयात करणंही श्रीलंका सरकारला शक्य नाही. 1948 ला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंका एवढ्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पेट्रोल पंपावर रांगा फेब्रुवारीपासूनच देशात इंधन टंचाई दिसू लागली होती. यामुळे पेट्रोल पंपांबाहेर, तसंच गॅस आणि इतर इंधन विकणाऱ्या दुकानांबाहेर लोकांच्या मोठ्या रांगा (Sri Lanka Queue outside Petrol Pumps) दिसून येत होत्या. काही काळाने या ठिकाणी हिंसाचार घडू नये यासाठी सैन्यही तैनात करण्यात आलं होतं. यानंतर भारताने (India Helps Sri Lanka) श्रीलंकेला हजारो टन डिझेल, पेट्रोल आणि इतर इंधन दिलं होतं. सोबतच अन्न आणि औषधांची मदतही पाठवली होती. काही काळ दिलासा मिळाल्यानंतर श्रीलंकेतील इंधन टंचाईने पुन्हा डोकं वर काढलं आहे. माजी क्रिकेटरने लोकांना वाटला चहा-पाव संपूर्ण देश अडचणीत सापडलेला असताना श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रोशन महानामा (Roshan Mahanama) यांनी पेट्रोल पंपाबाहेर रांगेत असणाऱ्या लोकांना चहा आणि पाव याचं वाटप केलं. महानामा हा 1996 साली वर्ल्ड कप जिंकलेल्या श्रीलंका क्रिकेट टीमचा सदस्य आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “इथल्या कम्युनिटी मील शेअरमधून आम्ही वार्ड प्लेस आणि विजेरामा मावाथा या ठिकाणी पेट्रोलपंपाबाहेर रांगेत असणाऱ्या लोकांना चहा आणि पाव दिला. इथल्या रांगा दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत. तसंच, एवढा वेळ रांगेत उभं राहिल्यामुळे लोकांच्या तब्येतीवरदेखील परिणाम होतो आहे.” असं महानामा यांनी आपल्या ट्विटमध्ये (Roshan Mahanama tweet) म्हटलं आहे. “कृपया रांगेत एकमेकांकडे लक्ष द्या. येताना पुरेसं पाणी आणि खाद्यपदार्थ घेऊन या. जर तुम्हाला बरं वाटत नसेल, तर जवळच्या व्यक्तीला सांगा, किंवा 1990 या क्रमांकावर फोन करून मदत मागा. या अडचणीच्या काळात आपल्याला एकमेकांची काळजी घ्यायची आहे.” असं आवाहनदेखील महानामानं केलं आहे. Chess Olympiad 2022 : पंतप्रधानांच्या उपस्थितीत चेस ऑलिपियाडच्या मशालीचे उद्घाटन सरकारी कार्यालयं बंद इंधन टंचाईमुळे सार्वजनिक वाहनांवर येणारा ताण टाळण्यासाटी श्रीलंका सरकारने सर्व सरकारी कार्यालयं बंद (Sri Lanka Govt offices) करण्याची घोषणा केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून वर्क फ्रॉम होम करावं असा आदेश शुक्रवारी (17 जून 22) देण्यात आला होता. त्यामुळे आजपासून (19 जून 22) श्रीलंकेतील सरकारी कार्यालये आणि शाळादेखील बंद असणार आहेत.
    First published:

    Tags: Cricket, Economic crisis, Sri lanka

    पुढील बातम्या